Kolhapur ZP Election 2022 : कोल्‍हापूर जिल्‍हा परिषदेच्या 76 गटांसाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमध्ये अनेक दिग्गजांना झटका बसला आहे. आरक्षण सोडतीमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी 20 जागा राखीव झाल्या आहेत. यामध्ये प्रत्येकी 10 महिला आणि 10 पुरुष असतील. खुल्या प्रवर्गासाठी 45 गट राखीव झाले आहेत. यातील 22 गट खुल्या वर्गातील महिलांसाठी राखीव आहेत. 10 गट अनुसूचित जातीसाठी ( महिला आणि पुरुष प्रत्येकी ) तर पट्टणकोडोली गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला आहे. बहुतांश इच्‍छुकांच्या मतदारसंघात अपेक्षित आरक्षण न पडल्याने जाहीर नाराजी दिसून आली. ओबीसी आरक्षण काढतानाही इच्‍छुकांची उत्‍कंठा शिगेला पोचली होती. 

गट क्रमांक मतदारसंघ व जाहीर आरक्षण खालीलप्रमाणे आहे

  1. शित्तूर तर्फ वारुण (शाहूवाडी) - सर्वसाधारण
  2.  सरुड - अनुसूचित जाती
  3.  बांबवडे - सर्वसाधारण
  4.  सावे - सर्वसाधारण महिला
  5.  येळवण जुगाई - सर्वसाधारण महिला
  6.  सातवे (पन्‍हाळा) - अनुसूचित जाती महिला
  7.  कोडोली  - ओबीसी
  8.  वाडीरत्‍नागिरी - सर्वसाधारण महिला
  9.  पोर्ले तर्फ ठाणे - अनुसूचित जाती महिला
  10.  कोतोली - अनुसूचित जाती महिला
  11.  पुनाळ - ओबीसी महिला
  12.  कळे - अनुसूचित जाती
  13. घुणकी - ओबीसी
  14.  टोप - सर्वसाधारण महिला
  15.  भादोले - सर्वसाधारण महिला
  16.  कुंभोज - सर्वसाधारण महिला
  17.  हेर्ले - ओबीसी महिला
  18.  शिरोली - सर्वसाधारण
  19. रुकडी - ओबीसी
  20.  कोरोची - सर्वसाधारण
  21.  कबनूर - सर्वसाधारण
  22.  चंदूर - सर्वसाधारण महिला
  23.  पट्टणकोडोली - अनुसूचित जमाती महिला
  24. रेंदाळ - ओबीसी महिला
  25. दानोळी (शिरोळ) - ओबीसी महिला
  26. उदगाव - सर्वसाधारण महिला
  27. आलास - सर्वसाधारण
  28. नांदणी - सर्वसाधारण
  29.  यड्राव - ओबीसी
  30. अब्‍दुललाट - ओबीसी
  31.  आकिवाट - सर्वसाधारण
  32.  दत्तवाड - ओबीसी महिला
  33. कसबा सांगाव - सर्वसाधारण
  34.  सि‍द्धनेर्ली - अनुसूचित जाती
  35.  बोरवडे  - सर्वसाधारण महिला
  36.  बानगे - सर्वसाधारण
  37.  कसबा चिखली - अनुसूचित जाती
  38. कापशी  - सर्वसाधारण
  39.  शिये - ओबीसी महिला
  40.  वडणगे - ओबीसी महिला
  41. उचगाव - सर्वसाधारण महिला
  42. मुडशिंगी - सर्वसाधारण
  43. उजळाईवाडी - सर्वसाधारण
  44.  गोकुळ शिरगाव - अनुसूचित जाती
  45. पाचगाव - सर्वसाधारण महिला
  46. वाशी - सर्वसाधारण महिला
  47. शिंगणापूर - सर्वसाधारण
  48. सांगरुळ - सर्वसाधारण महिला
  49. शिरोली दुमाला - सर्वसाधारण महिला
  50. परिते - सर्वसाधारण  महिला
  51. निगवे खालसा - अनुसूचित जाती महिला
  52. तिसंगी (गगनबावडा) - सर्वसाधारण महिला
  53. असळज - सर्वसाधारण महिला
  54. राशिवडे बुद्रुक - ओबीसी महिला
  55. कसबा तारळे - सर्वसाधारण
  56. ठिकपुर्ली - सर्वसाधारण
  57. कसबा वाळवे - सर्वसाधारण महिला
  58. सरवडे - सर्वसाधारण महिला
  59. राधानगरी - सर्वसाधारण
  60.  गारगोटी - सर्वसाधारण
  61.  पिंपळगाव - ओबीसी महिला
  62.  आकुर्डे - सर्वसाधारण महिला
  63.  कडगाव - ओबीसी
  64.  उत्तूर - ओबीसी
  65.  वाटंगी - सर्वसाधारण
  66. पेरणोली - सर्वसाधारण महिला
  67. कसबा नूल - सर्वसाधारण
  68. हलकर्णी - अनुसूचित जाती महिला
  69. भडगाव - सर्वसाधारण
  70. गिजवणे - सर्वसाधारण
  71. नेसरी - ओबीसी
  72. गवसे - ओबीसी
  73. माणगाव - ओबीसी महिला
  74. कुदनूर - ओबीसी
  75. तुर्केवाडी - सर्वसाधारण महिला
  76. तुडये - सर्वसाधारण