Kolhapur KMT : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून कोल्हापूर शहरात दोन गट पडले आहेत. हद्दवाढीवरून विरोध करणाऱ्या गावांची आज कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समिती व समन्वय समितीकडून केएमटीच्या बुद्ध गार्डन येथील वर्कशॉपसमोर पहाटेपासूनच बसेस रोखून धरल्या. तोट्यातील मार्ग बंद करावेत, अशी मागणी कृती समितीने केली. आंदोलकांनी गेटवरच ठिय्या मारल्याने शहरातील बससेवा ठप्प झाली. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.


ग्रामीण भागातील जे मार्ग तोट्यात आहेत, ते तत्काळ बंद करा, हद्दवाढीला विरोध करत असल्याने शहरवासियांच्या करातून गावांना बस सेवा देऊ नये, अशी आग्रही मागणी कृती समितीने केली होती. त्यानुसार केएमटी प्रशासनाने प्रक्रियाही  सुरु केली आहे. 24 पैकी तीन मार्ग बंद करण्यात आले आहेत. मात्र कृती समितीने तोट्यातील सर्व मार्गावर तत्काळ बस सेवा बंद करावी, अशी मागणी केली आहे. 


अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक टीना गवळी यांनी टप्प्याटप्प्याने मार्ग बंद केले जातील असे आश्वासन आंदोलकांना दिले. पण तोट्यातील मार्ग बंद होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार हद्दवाढ कृती समितीने केला त्यामुळे हा वाद चिघळला आहे. त्यामुळे आज शहरवासियांना फटका बसला आहे.


दरम्यान, ज्या गावांकडून हद्दवाढीसाठी विरोध करण्यात येत आहे अशा गावांतील बससेवा रद्द करण्यात यावी अशी मागणी कृती समितीकडून करण्यात आली होती. पण प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली नसल्याने बस रोखणार असल्याचा इशारा कृती समितीचे बाबा इंदुलकर यांनी दिला होता. यासंदर्भात त्यांनी महालालिका प्रशासन आणि पोलिस अधीक्षकांना पत्रकाद्वारे माहिती दिली होती.


इतर महत्त्वाच्या बातम्या