Kolhapur Circuit Bench: पक्षकार, वकिलांपासून ते सर्वसामान्य ते राजकीय नेत्यांपर्यंत गेल्या 42 वर्षांपासून दिलेल्या लढ्याचे स्वप्न साकार झालं असून कोल्हापूर सर्किट बेंचची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी गेल्या साडेचार दशकांपासून लढा सुरु आहे. खंडपीठाची पहिली पायरी सर्कि बेंचच्या माध्यमातून झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सहा जिल्ह्यांमध्ये सर्वसामान्यांच्या मुंबईमधील चकरा पूर्णतः थांबणार आहेत. सर्किट बेंचची अधिसूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती अधिसूचित केल्यानंतर आता सर्किट बेंच लोकार्पण 16 ऑगस्ट रोजी होणार आहे. पाच जिल्ह्यातील बार असोसिएशन प्रमुख पदाधिकारी, महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिल पदाधिकारी जेष्ठ वकील आणि लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. सर्किट बेंचचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सरन्यायाधीश भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. महासैनिक दरबार हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. कोल्हापुरात सीपीआर समोरील इमारतीमध्ये 18 ऑगस्टपासून सर्किट बेंचच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरूवात होणार आहे. 

Continues below advertisement


पहिल्या टप्प्यात चार ते पाच न्यायमूर्ती 


दरम्यान, सर्किट बेंचसाठी पहिल्या टप्प्यांमध्ये चार ते पाच न्यायमूर्तींची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चार न्यायमूर्तींचे कामकाज चालण्याची व्यवस्था सीपीआरसमोर कौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीमध्ये करण्यात आली आहे. याशिवाय प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन प्रमुख आणि किमान 40 कर्मचाऱ्यांची नियुक्ती असेल अशी शक्यता बार असोसिएशनकडन व्यक्त करण्या आली आहे. 


खंडपीठासाठी शेंडा पार्कमध्ये जागा प्रस्तावित 


सध्या कोल्हापूर शहरात शेंडा पार्कमध्ये खंडपीठासाठी जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र, न्यायमूर्तींनी पाहणी केल्यानंतर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आली आहे. खंडपीठासह निवासस्थाने सुद्धा यामध्ये प्रस्तावित आहेत. त्यामुळे जागा अंतिम  झाल्यानंतर पुढील चार ते पाच वर्षात खंडपीठाची स्वत:ची वास्तू असेल. 


कोल्हापुरात पुन्हा केंद्रबिंदू होणार 


कोल्हापूर कोकण दक्षिणेचं प्रवेशद्वार असल्याने शहराचे भौगोलिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे गेल्या साडे चार दशकांपासून सर्किट बेंचसाठी लढा सुरु होता. आता लढा प्रत्यक्षात साकार झाल्याने कोल्हापूरची कनेक्टिव्हिटी आता आणखी वाढणार आहे. कोल्हापूर विमानतळ पूर्ण क्षमतेनं सुरु झालं असून रेल्वे आणि महामार्गांच्या माध्यमातून वाहतूक सुद्धा आकार घेत आहे. त्यामुळे आता कोल्हापूरच्या विकासासाठी सुद्धा हा मैलाचा दगड ठरेल. 


इतर महत्वाच्या बातम्या