कोल्हापूर : सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी दोन्ही युती शेतकरी आणि महाराष्ट्रातील ग्रामीण मतदारांना सोडून देत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा जागेसाठी उमेदवारी दाखल केली. शेट्टी यांनी 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दोनदा विजय मिळवला होता.
लोकसभेच्या रिंगणात चौथ्यांदा उतरलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी विराट शक्तीप्रदर्शनाने हातकणंगले लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. उन्हाची पर्वा न करता हजारो शेतकऱ्यांनी राजू शेट्टी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन केले. त्यांनी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातून बैलगाडीने जात उमेदवारी अर्ज दाखल केला.
एकूण संपत्तीत आणि कर्जातही वाढ
राजू शेट्टी यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात एकूण संपत्तीची माहिती दिली आहे. शेट्टी यांच्या संपत्तीमध्ये 45 लाखांची वाढ झाली आहे. राजू शेट्टी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्या एकूण संपत्तीतमध्ये 45 लाख रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, संपत्तीबरोबरच त्यांच्या कर्जामध्येही 1 कोटी 41 लाखांनी वाढ झाली आहे. राजू शेट्टी यांनी 2019 च्या निवडणुकीत सादर केलेल्या संपत्ती विवरणपत्रामध्ये एकूण मालमत्ता 2 कोटी 36 लाख 47 हजार 333 रुपये दाखवली होती. 2024 च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सोबत सादर केलेल्या संपत्तीच्या विवरण पत्रामध्ये दोन कोटी 81 लाख 34 हजार 866 मालमत्ता मूल्य असल्याचे नमूद केलं आहे. 2019 मध्ये शेट्टी यांच्यावर 7 लाख 74 हजार इतके कर्ज होते. त्यामध्ये आता एक कोटी 41 लाखांनी वाढ झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या