Dispute Over Elephants in Nandani Math: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील जैन मठाच्या महादेवी हत्तीणीचा अखेर गुजरातमधील वनतारामध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात नांदणी मठाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मठाची याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे हत्तीणीसाठी केलेल्या प्रयत्नांवर पाणी फेरलं आहे. हत्तीणीला नेण्यासाठी वनताराची टीम आल्याचे नांदणीमधील ग्रामस्थ मध्यरात्री रस्त्यावर उतरले होते. दोन दिवसांपूर्वी मूक मोर्चाही काढण्यात आला होता. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाच्या आलेल्या निर्णयाने महादेवी हत्तीणीची रवानगी वनतारामध्ये होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने मठाधिपती जिनसेन भट्टारक पट्टाचार्य यांनी न्यायालयाचा निर्णय मान्य असल्याचे सांगत अधिक प्रतिक्रिया दिली नाही. उद्या मठात बैठक बोलावण्यात आल्याची माहिती दिली. दुसरीकडे, उच्च न्यायालयाकडून गुजरातमधील वनतारामध्ये हत्तीणीला पाठवण्यासाठी सूचना करण्यात आल्यानंतर नांदणीवासियांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

Continues below advertisement

Continues below advertisement

प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल

गेल्या बाराशे वर्षाची परंपरा महादेवी मठाला आहे. त्यामुळे या नांदणी मठाचा हत्ती का हवा आहे? असा सवाल समाज बांधवांकडून करण्यात आला. नांदणी येथील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ नांदणी यांच्याकडे हत्ती आहे. एका बाजूला प्राण्यांचा गुणवत्तापूर्ण जीवनाच्या हक्काचा आणि धार्मिक विधीसाठी हत्तीच्या वापराच्या हक्काचा संघर्ष असताना प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलं होतं.  

का वाद निर्माण झाला? 

महादेवी हत्तीणीचा वन विभागाकडून  परवानगी न घेता मिरवणुकीसाठी वापर झाल्याचा आरोप 'पेटा'ने केला. प्रकरण न्यायिक पातळीवर पोहोचल्यानंतर चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. समितीने हत्तीणीची पाहणी करून अहवाल सादर केला होता. यानंतर मुंबई प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण नोंदवलं होतं.  

इतर महत्वाच्या बातम्या