Sumangalam Lokotsav : कोल्हापुरातील कणेरी येथील सिद्धगिरी मठावर पंचमहाभूतांवर आधारित होत असलेल्या सुमंगलम महोत्सवाचे उद्घाटन आज करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून सुमंगलम महोत्सवाची राजकीय पातळीवरून मोठी चर्चा होत असल्याने काडसिद्धेश्वर महाराज (Adrushya Kadsiddheshwar Swamiji) यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा रंगली होती. मात्र, त्यांनी महोत्सवाच्या व्यासपीठावरून मनोगत व्यक्त करताना राजकीय चर्चेच्या प्रवेशावर भाष्य केले.  


माझा दिवसाचा खर्च 10 रुपये : काडसिद्धेश्वर महाराज


स्वामीजी (Adrushya Kadsiddheshwar Swamiji) म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून राजकीय प्रवेशाची चर्चा रंगली आहे. मात्र, राजकीय प्रवेश या जन्मात तरी शक्य होणार नाही. एका संन्याशाने संन्यास घेतल्यानंतर त्यापेक्षा मोठा अलंकार होऊ शकत नाही. मी संन्याशी आहे, लंगोट घातला निघू लागलो, माझा दिवसाचा खर्च 10 रुपये आहे. ते पुढे म्हणाले की, स्वामीजी त्या विचारांचे नाहीत हे लक्षात आल्यानंतर शासकीय पातळीवरून सहकार्य सुरू झाले. सरकारने आपला कार्यक्रम समजला. आम्ही हा कार्यक्रम छोट्या प्रमाणात करणार होतो. राजा प्रसन्न झाल्यास बरंच काही होते. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दिवसरात्र काम करत आहेत. सरकारी अधिकारी या पद्धतीने सुद्धा काम करु शकतात, यावर विश्वास नाही. 


आम्ही विचार राखणारे आहोत


दरम्यान, स्वामीजी पर्यावरणाच्या ऱ्हासावर भाष्य केले. ते म्हणाले पृथ्वीवर माती खराब होऊ लागली आहे. पाण्याची अवस्था बिकट झाली आहे. हवाही प्रदुषित झाली आहे, कार्बन डायऑक्साईड वाढत आहे. नायट्रोयन आहे तेवढाच आहे. पृथ्वीचे तापमान वाढत असल्याने ग्लेशियअर वितळत आहेत. तापमान वाढल्यास ऊसावर परिणाम होणार आहे. कार्बन वाढल्यास परिस्थिती बिकट होईल. त्यामुळे आपल्याला जीवनशैलीत बदल करावा लागेल. अमेरिकेमध्ये 70 च्या दशकात पाच टक्के लोक 25 टक्के लोकांची उर्जा खर्च करत होते. याबाबत त्यांना इशारा देऊनही त्यांनी काही केलं नाही. मात्र, आम्ही विचार राखणारे आहोत. एक संदेश घेऊन जावावे हा प्रयत्न आहे. वेस्टचे (प्लास्टिक कचरा) वेल्थमध्ये रुपांतर करा.


सुमंगलम विचारसंपदा पुस्तक प्रकाशित


दरम्यान, या कार्यक्रमात स्वामीजींच्या विचारावर आधारित सुमंगलम विचारसंपदा हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. पत्रकार गुरुबाळ माळी यांनी पुस्तक लिहिलं आहे. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते उद् घाटन करण्यात आले. तसेच, पाण्यात विरघळणाऱ्या कापडी पिशव्या उद्धाटन करण्यात आले. तीन लाख कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात येणार आहे. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी आपल्या मनोगतामध्ये कणेरी मठावर होत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच महोत्सवात होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. 


महत्वाच्या इतर बातम्या :