Shivaji University : शिवाजी विद्यापीठाच्या (Shivaji University) अधिसभेची (shivaji university senate election 2022) निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. अधिसभेसाठी 14 नोव्हेंबर रोजी  मतदान होणार असून 16 नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल. चालू अधिसभेची मुदत संपून एक महिन्याचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे प्रभारी कुलसचिवांकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. 


शिवाजी विद्यापीठाकडून जाहीर केलेल्या कालावधीमध्ये ज्या पदवीधरांकडून निवडणुकीसाठी नोंदणी करण्यात आली आहे, त्यांनाच मतदानाचा अधिकार असणार आहे. विद्यापीठातील अधिविभाग आणि विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातून पदवी घेतलेले पदवीधर यासाठी मतदान करतात. तसेच प्राचार्य, प्राध्यापक आणि संस्थाचालक यांनाही अधिसभेमध्ये निवडून येण्याची संधी असते. याशिवाय राज्यपाल नियुक्त जागाही असतात. 


अधिसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने विद्यापीठ विकास मंच व विद्यापीठ विकास आघाडी यांच्यातील जागावाटपाकडे लक्ष लागले आहे. विद्यापीठातील इतर संघटनांकडेही लक्ष असेल. समविचारी संघटना, विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्ष यांच्या माध्यमातून पदवीधर नोंदणी करण्यास प्रारंभ करण्यात आला होता. 


अधिसभा निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे



  • 21 सप्टेंबर : तात्पुरती मतदार यादी प्रसिद्ध करणे

  • 26 सप्टेंबर : तात्पुरत्या मतदारयादीमध्ये वगळलेल्या किंवा चुकीच्या कोणत्याही नोंदीबाबत दुरुस्ती

  • 1 ऑक्टोबर : दुरुस्त मतदार यादी प्रसिद्ध होणार 

  • 6 ऑक्टोबर : दुरुस्त मतदार यादीसंदर्भात आक्षेप असल्यास अपील करता येणार 

  • 12 ऑक्टोबर : अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार 

  • 14 ऑक्टोबर : निवडणूक सूचना प्रसिद्ध करणे

  • 28 ऑक्टोबर : उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिवस 

  • 31 ऑक्टोबर : उमेदवारी अर्जाची छाननी करणे

  • 1 नोव्हेंबर : उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस 

  • 2 नोव्हेंबर : उमेदवारी अर्जाच्या वैधतेबाबत कुलगुरूंकडे अपील 

  • 3 नोव्हेंबर : अंतिम पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल 

  • 14 नोव्हेंबर : मतदान

  • 16 नोव्हेंबर : निकाल जाहीर होणार 


अशी असेल शिवाजी विद्यापीठाची अधिसभा 


महाविद्यालयीन शिक्षक 10, नोंदणीकृत पदवीधर 10, प्राचार्य 10, संस्थाचालक 6, शिक्षकेतर कर्मचारी 1, विद्यापीठ अधिविभाग, प्रशासन कर्मचारी 1, विद्यापीठ प्राध्यापक 3, राज्यपाल नियुक्त प्रतिनिधी 10, विधान परिषद 2, विधानसभा 1, स्थानिक स्वराज्य संस्था 1


इतर महत्वाच्या बातम्या