Sanjay Mandlik : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ठाकरे गटाकडून बोगस प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आल्याच्या कथित आरोपानंतर मुंबई गुन्हे शाखेचे पथक कोल्हापूरमध्ये दाखल झालं आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांनी तोफ डागली आहे. सच्च्या शिवसैनिकांनी खोट्या पद्धतीची कागदपत्रे तयार करायला नको होती, न्यायालयात त्याचा निकाल होईलच, असा टोला त्यांनी लगावला आहे. 

Continues below advertisement


दरम्यान, शिंदे गटाला ढाल आणि तलवार चिन्ह मिळालं असलं, तरी ते तात्पूरतं आहे. शिवधनुष्य चिन्ह आम्हालाच मिळणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला. संजय मंडलिक म्हणाले, खोटी शपथपत्र मुंबईत सापडली त्याचा  तपास महाराष्ट्रात सुरु आहे. सच्च्या शिवसैनिकांनी खोट्या पद्धतीची कागदपत्रे तयार करायला नको होती, न्यायालयात त्याचा निकाल होईल. 70 टक्के लोकप्रतिनिधी शिंदे गटाकडे आहेत. त्यामुळे खरी शिवसेना कोणती हे सिद्ध झालं आहे  त्यामुळे केविलवाणा प्रयत्न त्या शिवसेनेनं करू नये. 


भाडोत्री माणसं गोळा करावी लागत आहेत


मंडलिक पुढे म्हणाले की, शिवसैनिकांना अशा पद्धतीने काम करण्याची गरज नाही. जो सच्चा शिवसैनिक आहे तो प्रतिज्ञापत्र देईलच, पण बोगस करण्याची गरज नाही. त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणायचं, पण खऱ्या शिवसेनेचा विचार कोणी सोडला हे लक्षात येत आहे. त्यामुळे भाडोत्री माणसं गोळा करावी लागत आहेत. बनावट प्रतिज्ञापत्र सक्षम अधिकारी  चूक की बरोबर ठरवतील. 


दरम्यान, या कारवाईनंतर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये सरकारविरोधात जास्त आंदोलने झाली, त्याच जिल्ह्यांमध्ये कारवाई होत असल्याचा टोला संजय पवार यांनी लगावला. आम्ही सर्व शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे प्रतिज्ञापत्र दिली असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबई गुन्हे शाखेला आमचे सर्व सहकार्य राहील, असेही संजय पवार म्हणाले आहेत. 


चार जिल्ह्यांमध्ये चौकशी सुरु 


दुसरीकडे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची चार पथक कोल्हापूर, पालघर, अहमदनगर आणि नाशिकमध्ये पोहोचली आहेत. पोलीस अधीक्षकांचे कार्यालयामध्ये या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. ठाकरे यांच्या समर्थनात दिलेली सुमारे साडे 4 हजार प्रतिज्ञापत्र बोगस असल्याचा आरोप शिंदे गटाकडून केला जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या