Kolhapur News : कसबा बावड्यातील श्रीराम विकास सेवा संस्थेच्या (Shriram Seva Society) पंचवार्षिक निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ हनुमान पॅनलने सलग चौथ्यांदा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत सत्ता कायम राखली आहे. सतेज पाटील गटाने संस्थेच्या सर्व 16 जागा जिंकल्या. आघाडीच्या सर्वच उमेदवारांना 2 हजारांवर मते मिळाली. विजयानंतर समर्थकांनी चांगलाच जल्लोष केला.
सत्तारुढ पॅनेलच्या विरोधात राजाराम कारखान्याचे संचालक दिलीप उलपे, माजी नगरसेवक प्रदीप उलपे तसेच प्रशांत पाटील यांनी पॅनेल उभे केले होते. मात्र, दारुण पराभवाला त्यांना सामोरे जावे लागले.
काल संस्थेच्या कार्यालयात मतदान पार पडले होते. विजयानंतर सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, चांगला कारभार केल्याने सभासदांनी पुन्हा विश्वास टाकला आहे. संस्थेच्या प्रगतीची घौडदौड कायम राहिल. त्यामुळे विरोधकांना चोख उत्तर मिळाले आहे.
विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते
सर्वसाधारण खातेदार कर्जदार
- उमाजी उलपे ( 3078 मते )
- युवराज उलपे ( 2986)
- धनाजी गोडसे (3030)
- राजीव चव्हाण ( 2810 )
- हिंदूराव ठोंबरे (3051)
- अनंत पाटील ( 2950)
- मारुती पाटील (3098 )
- मिलिंद पाटील ( 3053 )
- संतोष पाटील (3017)
- तानाजी बिरेजे (2964)
- रमेश रणदिवे (3016),
- विलास वाडकर (2861)
महिला प्रतिनिधी
- शीतल पाटील (3410)
- सविता रणदिवे (3245)
अनुसूचित जाती जमाती
- सुभाष गदगडे (3313)
इतर मागासवर्गीय
- पुणैद्रु गुरव (3228)
भटक्या विमुक्त
- दत्तात्रय मासाळ (बिनविरोध)
इतर महत्त्वाच्या बातम्या