Sanjay Raut In Kolhapur : खासदार संजय राऊत शिवगर्जना मेळाव्यातून पुन्हा एकदा शिंदे गटावर हल्लाबोल केला. संजय पवार महाराष्ट्राला शिवसेनेवरच्या निष्ठेसाठी माहीत आहेत. आपल्या सर्वांचा जन्म शिवसेनेत झाला आहे, त्यामुळे या टेस्ट ट्यूब बेबी लोकांकडे लक्ष देऊ नका, अशा शब्दात संजय राऊत यांनी हल्ला चढवला. ते म्हणाले की, जे महानाट्य सुरू केलेय ते यशस्वी होणार आहे. कोल्हापूरची भूमी परिवर्तन करणारी भूमी आहे. बाळासाहेबांची महानता मोठी होती. त्यांनी माकडाची माणसे केली, माणसांचे सरदार केले आणि यातील काहींनी खंजीर खुपसला. या लोकांनी आपल्या आईला विकले. जे महाराष्ट्र आणि शिवसैनिक विसरणार नाही. ते पुढे म्हणाले की, संजय राऊत संपूर्ण देशाला माहीत आहेत हे बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे. दिशा देण्यासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. 


सविस्तर  बातमी थोड्याच वेळात