Kolhapur Basket Bridge : 12-13 वर्षे सत्ता विरोधकांच्या ताब्यात होती, पण या सत्तेच्या माध्यमातून कोणताही भरीव प्रकल्प कोल्हापूरकरांना पाहिला नाही, पण जो करत असेल त्याला विरोध मात्र करतात. आता मी खासदार झालो आहे, आता कोल्हापूरची ओळख फक्त आणि फक्त डेव्हलपमेंट म्हणून घेतली जाते, असा टोला भाजप खासदार संजय मंडलिक यांनी लगावला. बास्केट ब्रिजवरून खिल्ली उडवण्यात आली होती, असेही ते म्हणाले. 


हाच धागा पकडून शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांनी खिल्ली उडवल्याची कबूली दिली. संजय मंडलिक म्हणाले,  लोकसभेचे विरोधी उमेदवार म्हणून बास्केट ब्रीजची मी देखील खिल्ली उडवली होती, पण धनंजय महाडिक यांची जबरदस्त इच्छाशक्ती होती. म्हणून आज या बास्केट ब्रीजचं भूमिपूजन आज होत आहे याचा मला मनापासून आनंद आहे.


सत्तेचा वापर कोल्हापूरच्या विकासासाठी नव्हे तर स्वतःसाठी केला 


धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता हल्लाबोल केला. ते म्हणाले, सत्तेचा वापर कोल्हापूरच्या विकासासाठी नव्हे तर स्वतःसाठी केला गेला. त्यामुळे बाहेरील नागरिक देखील कोल्हापूरकडे वेगळ्या नजरेनं पाहत आहेत, पण आता मी खासदार झालो आहे, आता फक्त कोल्हापूरचा विकास आणि विकासच केला जाईल. कोल्हापूर शहरात आणखी 7 उड्डाणपूल हवे आहेत, गडकरी साहेब आम्हाला या पुरातून वाचवा, दरवर्षी अनेक गावं पाण्यात जातात, अशी मागणी महाडिक यांनी केली. कोल्हापूर महापालिकेला 75 इलेक्ट्रिकल बस हव्या असल्याचेही त्यांनी सांगितले. 


आमच्यावर पूर्ण महाडिक घराण्यावर टीका झाल्या. जे शब्द देतात ते पाळतात त्यांचं नाव महादेवराव महाडिक आहे. आता खासदार झाल्यानंतर पुन्हा पाठपुरावा सुरू केला. मी गेले दोन-तीन महिने खासदार झाल्यापासून साहेबांना (नितीन गडकरी) भेटत होतो. बास्केट ब्रिज पायाभरणी कार्यक्रम हा गडकरी साहेबांच्या हस्ते झाला पाहिजे आणि चंद्रकांत दादांचा आग्रह होता. 12-13 वर्षे सत्ता आपल्या विरोधकांच्या ताब्यामध्ये होती, पण या सत्तेच्या माध्यमातून कुठलाही भरीव प्रकल्प कोल्हापूरकरांना पाहिला नाही, पण जो करत असेल त्याला विरोध मात्र करतात. आता मी खासदार झालो आहे, आता कोल्हापूरची ओळख फक्त आणि फक्त डेव्हलपमेंट म्हणून घेतली जाते. 


इतर महत्वाच्या बातम्या