Kolhapur Basket Bridge : कोल्हापूर शहराच्या सौदर्यांत भर घालणारा आणि महापुरात संपर्क तुटू नये म्हणून यासाठी प्रस्तावित असलेला बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित बास्केट ब्रिजची पायाभरणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते करण्यात आली. या ब्रिजची संकल्पना मांडून पाठपुरावा केलेल्या खासदार धनंजय महाडिक (Dhanjay Mahadik) यांनी नाव न घेता सतेज पाटील (Satej Patil) यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला.  


सत्तेचा वापर कोल्हापूरच्या विकासासाठी नव्हे तर स्वतःसाठी केला गेला. त्यामुळे बाहेरील नागरिक देखील कोल्हापूरकडे वेगळ्या नजरेनं पाहत आहेत, पण आता मी खासदार झालो आहे, आता फक्त कोल्हापूरचा विकास आणि विकासच केला जाईल. कोल्हापूर शहरात आणखी 7 उड्डाण पूल हवे आहेत, गडकरी साहेब आम्हाला या पुरातून वाचवा, दरवर्षी अनेक गावं पाण्यात जातात, अशी मागणी महाडिक यांनी केली. कोल्हापूर महापालिकेला 75 इलेक्ट्रिकल बस हव्या असल्याचेही त्यांनी सांगितले. 


ते म्हणाले की, कोल्हापूर शहराला एक चांगलं प्रवेशद्वार असावं ही माझी संकल्पना होती. बास्केट ब्रिजचं सगळं सादरीकरण साहेबांनी (नितीन गडकरी) बघितलं आणि पाच मिनिटांमध्ये साहेबांनी 180 कोटी रुपये मंजूर केले. डिझाईनमध्येही बदल केला नाही. तसेच डिझाईन बास्केट ब्रिज नाव का दिले हे पण साहेबांनी विचारलं. मी सांगितलं तो पिलर लेस ब्रिज आहे आणि मुंबईमधील वरळी सी लिंकप्रमाणे असेल. आज त्याची पायाभरणी होत आहे.


बास्केट ब्रिज तीन ऐवजी चार लेन करावा, अशी विनंतीही त्यांनी गडकरी यांच्याकडे केली. तसेच प्रस्तावित आयलंडमध्ये भव्य शाहू महाराजांचे पुतळा व्हावा, हायवपासून ते विमानतळ चौपदरीकरण व्हावे, पन्हाळा, जोतिबा, गगनबावड्यासाठी रोप वे केबल कार्स मिळाव्या, अशी मागणी त्यांनी केली. 


कोल्हापुरात खालच्या पातळीचे राजकारण 


महाडिक म्हणाले, कोल्हापूरचं राजकारण गेल्या काही वर्षांमध्ये खूप खालच्या पातळीचे झालं आहे. आमचे नेते आदरणीय महादेवराव महाडिक साहेब यांच्यामुळे मी राजकारणामध्ये आलो. त्यांची एकच शिकवण होती आपल्याला जर काय बदल करा असेल तर दुसऱ्याला नाव ठेवून चालणार नाही, तर आपण स्वतः त्या मैदानात उतरावं लागेल. आपल्याला बदल करावे लागेल. प्रामाणिकपणे लोकांची सेवा करावी लागेल, ही शिकवण महाडिक साहेबांनी दिली आणि मग राजकारणामध्ये माझा प्रवेश झाला. दुर्दैवाने 2019 ला माझा पराभव झाला आणि आमच्या या कामाची खिल्ली उडवली गेली. असं सांगितलं गेलं की, असला काय कामच नाही. या हवेतल्या गोष्टी आहेत, कुठे आहे महाडिकांचा ब्रिज? पराभव झाल्यामुळे फार बोलता येत नव्हतं, पण पाठपुरावा सोडला नाही. 


आमच्यावर पूर्ण महाडिक घराण्यावर टीका झाल्या. जे शब्द देतात ते पाळतात त्यांचं नाव माझे नाव महादेवराव महाडिक आहे. आता खासदार पुन्हा पाठपुरावा सुरू केला. मी गेले दोन-तीन महिने खासदार झाल्यापासून साहेबांना भेटत होतो. बास्केट ब्रिज पायाभरणी कार्यक्रम हा गडकरी साहेबांच्या हस्ते झाला पाहिजे आणि चंद्रकांत दादांचा आग्रह होता. 12-13 वर्षे सत्ता आपल्या विरोधकांच्या ताब्यामध्ये होती, पण या सत्तेच्या माध्यमातून कुठलाही भरीव प्रकल्प कोल्हापूरकरांना पाहिला नाही, पण जो करत असेल त्याला विरोध मात्र करतात. आता मी खासदार झालो आहे, आता कोल्हापूरची ओळख फक्त आणि फक्त डेव्हलपमेंट म्हणून घेतली जाते. 


इतर महत्वाच्या बातम्या