sammed shikharji : झारखंड सरकारकडून सम्मेद शिखरजी (sammed shikharji) या तीर्थस्थळाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आल्यानंतर देशभरातून जैन समाजाकडून विरोध वाढत चालला आहे. त्यामुळे झारखंड सरकारकडून (sammed shikharji) हा निर्णय मागे घेण्यासाठी कोल्हापूरमध्ये सकल जैन समाजाकडून मंगळवारी 3 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जैन बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन प.पू.स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी केलं आहे. 


शिरोळ तालुक्यातील नांदणीत प.पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातर्फे सकल जैन समाजातर्फे दिगंबर, श्वेतांबर, स्थानकवासी, मूर्तिपूजक, तेरापंती, वीसपंती, मारवाडी आदी समाजाच्या पदाधिकर्‍यांची बैठक झाली. यावेळी ते म्हणाले की, 24 तीर्थंकर मोक्षस्थान असलेले सम्मेद शिखरजी हे अनादिकाळापासून जैन धर्मियांचे हृदय आहे. मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. (sammed shikharji) 


 sammed shikharji सम्मेद शिखरजी पर्यटनस्थळ करू नका 


दरम्यान, श्री सम्मेद शिखरजी पर्यटन स्थळ घोषित झाल्याने देशभरातून मोर्चे काढले जात आहेत. सम्मेद शिखरजी हे धार्मिक स्थळ असल्याचे जैन धर्मियांची भावना आहे. त्याचे पर्यटन स्थळात रूपांतर करता येणार नाही. झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांनी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहून जैन धर्माचे पवित्र स्थान असलेल्या सम्मेद शिखरजीला तीर्थक्षेत्र दर्जा राहावे यासाठी, अशी मागणी केली आहे. 


त्यांनी या पत्रात म्हटले आहे की, हे प्रकरण जैन समाजाच्या भावनांशी निगडित आहे. हे लक्षात घेऊन या विषयाचा फेरविचार व्हायला हवा. पर्यावरण मंत्रालयाने हे वन्यजीव अभयारण्य घोषित करून ते इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये ठेवले आहे. त्याचवेळी झारखंड सरकारने (सोरेन सरकार) याला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. काही काळापासून या भागात मांसाहार आणि दारूचे सेवन होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. जैन धर्मियांचे हे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र आहे. याला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्याने या परिसराचे पावित्र्य धोक्यात येईल, असे जैन धर्मीयांचे मत आहे.


दुसरीकडे, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने शुक्रवारी झारखंड सरकारला (sammed shikharji) पत्र लिहून पारसनाथ अभयारण्याबाबत जैन समाजाकडून होत असलेल्या मागणीवर प्राधान्याने विचार करण्यास सांगितले आहे. झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील पारसनाथ डोंगरावर असलेले सम्मेद शिखरजी हे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र आहे. पारसनाथ टेकडीवर धार्मिक पर्यटनाला चालना देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात जैन समाजाकडून तसेच सम्मेद शिखरजी तीर्थस्थळ राहण्यासाठी आतापर्यंत देशभरातून जैन समाजाकडून मोर्चे काढण्यात आले आहेत. हा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी मोर्चातून व्यक्त केली जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या