कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून करवीर संस्थानचे छत्रपती शाहू महाराज यांना महाविकास आघाडीतून काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. मोठ्या महाराजांसाठी 1 हजार टक्के कष्ट करणार असल्याचे सांगत संभाजीराजेंकडून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. महाराज कोल्हापूरला वेगळी दिशा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माझ्यासाठी महाराज सर्वस्व असून सर्व सहकाऱ्यांना हेच सांगितल्याचे संभाजीराजे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत उभा राहायचं निश्चित होतं. मात्र, ज्यावेळी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आणि आमचे वडील यांची इच्छा लढवत असतील तर माझा प्रश्नच येत नाही. शाहू महाराज एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. माझ्या निवडणुकीत 100 टक्के काम केलं असतं तर महाराज यांच्या प्रचारात 1 हजार टक्के काम करणार असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, जो निर्णय महाराज घेतील त्यांच्याबरोबर मी आणि माझे सर्व कार्यकर्ते राहणार आहेत. निवडणुकीचा शेवटचा टप्पा पूर्ण होईपर्यंत आमचं काम थांबणार नाही. कष्ट करण्यात आम्ही कुठंही कमी पडणार नाही. स्वराज्य संघटनाही कुठंही निवडणुकीत उभा राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. शाहू महाराज, मालोजीराजे आणि मी एकत्रितपणे या निवडणुकीत करणार असल्याचे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या