कोल्हापूरकागलमध्ये पुन्हा एकदा आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी निर्धार केला पाहिजे. कागलच्या हितासाठी जो निर्णय घ्यायला लागेल तो निर्णय घेण्यासाठी तयार असल्याचं सांगत समरजित घाटगे यांनी आगामी विधानसभेला तुतारी फुंकण्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. आईसाहेब म्हणाल्या, जिंकायचं असेल तर तुतारी हाती घ्यायला पाहिजे. आता विषय माझा नाही, तर कागलच्या विकासाचा असल्याने समरजित यांनी सांगितलं. समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शरद पवार यांच्या भेटीगाठी झाल्याचेही कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये जाहीरपणे सांगितले. 



इथून पुढे तुम्हाला त्रास होणार, सरकारी ताकद लावली जाईल


दरम्यान, हा निर्णय घेत असताना माझ्या वरिष्ठ नेत्यांशी बोललो असल्याचेही समरजित घाटगे म्हणाले. नेत्यांना सांगून करण्यासाठी धमक लागते. प्रेम केलं तर तन-मन-धन करून करायचं. इथून पुढे तुम्हाला त्रास होणार, सरकारी ताकद लावली जाईल, पण हा समरजित तुमच्या पाठीशी असल्याचे ग्वाही कार्यकर्त्यांना दिलीय सरकारी ताकद केवळ दोन महिने राहणार असल्याचे सांगत अप्रत्यक्षरित्या हसन मुश्रीफ यांना इशारा दिला.


आज समरजित घाटगे यांनी कागलमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला. या मेळाव्यामध्ये ते काय बोलणार? याकडे लक्ष होतं. गेल्या काही दिवसांपासून ते तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा रंगली होती. आजच्या मेळाव्यामधून तुतारी हाती घेण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. या मेळाव्यामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुद्धा पोहोचणार असल्याने जयंत पाटील काय बोलणार याकडे सुद्धा लक्ष आहे. 


माझ्या आणि शरद पवार साहेबांच्या भेटी झाल्या


दरम्यान समरजित घाटगे पुढे म्हणाले की, 2019 मध्ये आपली तयारी नव्हती, पण आपण लढलो. आता विषय माझा नाहीतर कागलचा आहे. माझ्या आणि शरद पवार साहेबांच्या भेटी झाल्या. मला विचार करण्यास सांगितलं. मी कागलच्या जनतेला विचारल्याशिवाय निर्णय घेणार नाही, असा निरोप त्यांना दिला होता. ते म्हणाले की आज जर निर्णय घेतला तर उद्यापासून कामाला लागावं लागेल. लोकांना समजावून सांगा समरजितला मत का करायचं, असंही घाटगे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना आवाहन केलं.


इतर महत्वाच्या बातम्या