Continues below advertisement

कोल्हापूर : कागलला जिल्ह्याचं राजकीय विद्यापीठ का म्हटलं जातं याची महाराष्ट्राला पुन्हा एकदा प्रचीती आली आहे. कागल नगरपालिकेमध्ये एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) आणि समरजीत घाटगे (Samarjeet Ghatge) हे एकत्र आले आहेत. मुश्रीफ हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तर समरजीत घाटगे हे शरद पवारांच्या (Sharad Pawar NCP) राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्यामुळे कागलमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचं चित्र आहे. असं असलं तरी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) गण्यावरूनच कागलमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर समरजीत घाटगेंनीही चक्रावणारं उत्तर दिलं आहे.

कागल आणि मुरगूड नगरपालिकेमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे हे दोन्ही गट एकत्र आले आहेत. आधी शिंदेंच्या शिवसेनेचे संजय मंडलिक आणि समरजीत घाटगे एकत्र येण्याच्या चर्चा होत्या. मात्र 24 तासांमध्ये कागलचं राजकारण फिरलं आणि कुणाच्या स्वप्नातही आलं नसेल अशी घटना घडली. कट्टर विरोधक हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे हे एकत्र येऊन दोन्ही नगरपालिका लढवणार आहेत.

Continues below advertisement

Samarjeet Ghatge On Kagal : शरद पवारांची परवानगी घेतली

समरजीत घाटगेंनी छत्रपती शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून महायुतीतील हसन मुश्रीफ यांच्याशी युती केली आहे. त्यामुळे तांत्रिकृष्ट्या, वरवर पाहता ही दोन्ही राष्ट्रवादींची युती नाही. आपण ही युती करण्यापूर्वी शरद पवारांची परवानगी घेतल्याचं समरजीत घाटगेंनी स्पष्ट केलं.

स्थानिक स्तरावर युती-आघाड्यांचे निर्णय स्थानिक नेत्यांनी घ्यावेत असं शरद पवारांनी सांगितलं आहे. तोच धागा पकडत समरजीत घाटगेंनी ही युती दोन्ही राष्ट्रवादींची नसल्याचं सांगितलं.

Samarjeet Ghatge On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरुन एकत्र?

समरजीत घाटगे आणि हसन मुश्रीफ एकत्र आल्यानंतर त्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यांनी टीका केली होती. पत्रकारांनी समरजीत घाटगेंना काही प्रश्न विचारले. त्यावर समरजीत घाटगेंनी दिलेलं उत्तरही चक्रावणारं होतं.

प्रश्न - देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरुन तुम्ही (मुश्रीफ-समरजीत) एकत्र आलात का?

समरजीत घाटगेंचं उत्तर - व्ही बी साहेब बोललेलं माझ्या तोंडात का टाकता? (राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील)

प्रश्न: आम्ही प्रश्न विचारतो, देवेंद्र फडणवीसांनी मुश्रीफ-घाटगेंची युती घडवून आणली का? नसेल तर नाही म्हणून स्पष्ट सांगा.

प्रश्न : मी योग्य वेळी पत्ते उघडेन.. तुम्ही 10 वेळा प्रश्न विचारला तरी माझं उत्तर एकच आहे.. पिक्चर अभी बाकी है.. ब्रह्मदेव जरी खाली आणला तरी माझं उत्तर बदलणार नाही.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर समरजीत घाटगेंनी स्पष्ट काही उत्तर दिलं नसल्याचं दिसून येतंय. त्यामुळे कागलमधील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनीच आदेश दिला असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगल्याचं दिसतंय.

Samarjeet Ghatge Kagal News : समरजीत घाटगे भाजपमध्ये जाणार का?

समरजीत घाटगे हे पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते होते. एकेकाळी देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू अशी ओळख असलेल्या समरजीत घाटगेंनी विधानसभेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि हसन मुश्रीफांविरोधात निवडणूक लढली. त्यामध्ये समरजीत घाटगेंचा पराभव झाला. मात्र, राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर समरजीत हे पुन्हा भाजपच्या वाटेवर आहेत अशी अधेमधे चर्चा असते. त्यावर आपण भाजपमध्ये जाणार नसून माध्यमांमध्येच तशा वावड्या उठत असल्याचं समरजीत घाटगे यांनी स्पष्ट केलं.

ही बातमी वाचा :