कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणूक (Loksabha Election) स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी घेतला आहे. कोल्हापूरसह (Kolhapur Loksabha) सहा जागांवर लक्ष केंद्रित केलं असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने देखील आम्हाला फसवलं आहे, त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा निर्णय आधीच जाहीर केला असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. 


शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली. मात्र, महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कालावधीत अनेक निर्णय शेतकरीविरोधी घेतले गेले. ऊसाच्या एफआरपीचे तुकडे केले. भूमी अधिग्रहण विधेयकात बदल करण्याचे काम महाविकास आघाडीच्या काळात झाले. यानंतर शरद पवारांना सात पानी पत्र लिहिलं होतं, पण उत्तर मिळाले नाही. त्यामुळे अडीच वर्षांपूर्वीच आम्ही निर्णय घेतला होता.  ते पुढे म्हणाले की, भाजपने छोटे मोठे सगळेच पक्ष संपवण्याचा विडा उचलला आहे. शेतकऱ्यांची नावे घेऊन फसवलं. त्यामुळे स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे. मतदारांना योग्य वाटल्यास मदत करतील. चळवळ सुरु राहिलं.


इतर महत्वाच्या बातम्या