Rajaram Sakhar Karkhana : अवघ्या कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या राजाराम साखर कारखान्याच्या (Rajaram Sakhar Karkhana) पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्तारुढ महाडिक गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. माजी आमदार महादेवराव महाडिक संस्था गटातून रिंगणात आहेत. राजाराम कारखाना कार्यस्थळावर सत्तारुढ छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली.
उत्पादक गट क्रमांक 1
1) विजय वसंत भोसले 2) संजय बाळगोंडा मगदूम
उत्पादक गट क्रमांक 2
1) शिवाजी रामा पाटील 2) सर्जेराव बाबुराव भंडारे 3) अमल महादेवराव महाडिक
उत्पादक गट क्रमांक 3
1) विलास यशवंत जाधव 2) डॉ.मारुती भाऊसो किडगावकर3) सर्जेराव कृष्णात पाटील (बोणे)
उत्पादक गट क्रमांक 4
1) तानाजी कृष्णात पाटील.2) दिलीपराव भगवान पाटील 3) मीनाक्षी भास्कर पाटील
उत्पादक गट क्रमांक 5
1) दिलीप यशवंत उलपे2) नारायण बाळकृष्ण चव्हाण
उत्पादक गट क्रमांक 6
1) गोविंद दादू चौगले 2) विश्वास सदाशिव बिडकर
महिला राखीव
1) कल्पना भगवानराव पाटील2) वैष्णवी राजेश नाईक
इतर मागास प्रतिनिधी
1) संतोष बाबुराव पाटील
अनुसूचित जाती जमाती
1) नंदकुमार बाबुराव भोपळे
भटक्या विमुक्त जाती जमाती
1) सुरेश देवाप्पा तानगे
संस्था गट
1) महादेवराव रामचंद्र महाडिक
कितीही प्रयत्न केले तरी राजाराम कारखाना बळकावता येणार नाही : महादेवराव महाडिक
माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, "गेली 28 वर्षे कारखाना ज्या विश्वासाने सभासदांनी आमच्या हाती सोपवला, त्याच विश्वासाने यंदाही कारखान्याचे सुज्ञ सभासद आम्हाला सेवेची संधी देतील. विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी राजाराम कारखाना त्यांना बळकावता येणार नाही." अमल महाडिक यांनी बोलताना सर्वसमावेशक उमेदवारांचे तगडे पॅनेल आम्ही जाहीर केल्याचे सांगितले. विजयाच्या दिशेने आम्ही पहिले पाऊल टाकल्याचे सांगितले. सर्वसामान्य शेतकरी सभासद आमच्या पॅनेलला भरघोस मतांनी विजयी करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. खासदार धनंजय महाडिक यांनी माघार घेतलेल्या उमेदवारांचे आभार मानले तसेच सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
29 अवैध उमेदवारांचे अपील नामंजूर
दरम्यान, विरोधी आघाडीतील राजाराम साखर कारखान्याच्या 29 अवैध उमेदवारांचे प्रादेशिक साखर सहसंचालकांनी अपील नामंजूर केलं आहे, या निर्णयाने विरोधी आमदार सतेज पाटील गटाला तगडा झटका बसला आहे. राजाराम कारखाना निवडणूक जाहीर होण्यापासून चर्चेत आहे. जिल्ह्यातील दोन मातब्बर गटांनी कारखान्याच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे दररोज दोन्हीकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या