Rajaram sakhar karkhana : सव्वा सात ते साडेसातच्या सुमारास आम्ही दसरा चौकात आलो. सत्तेचा वापर करून त्यांनी आम्हाला दसरा चौकात थांबवले. भीती नव्हती, तर दुर्लक्ष करायला पाहिजे होते. आम्हाला येऊ द्यायला हवे होते, पण महाडिक कंपनी घाबरल्याने त्यांनी पळवाट काढल्याचा हल्लाबोल आमदार ऋतुराज पाटील यांनी केला. माजी आमदार अमल महाडिक बिंदू चौकात साडे सातला येऊन गेल्यानंतर सव्वा आठच्या सुमारास ऋतुराज पाटील यांचे आगमन झाले. यावेळी त्यांनी महाडिकांवर तोफ डागली. अमल महाडिकांबद्दल मला बोलण्याची गरज नाही, थोरले महाडिकसाहेब येतील तेव्हा आम्ही ताकदीने येऊ. आम्ही शेतकरी मंडळी बास आहेय त्यांना बंटी साहेबांची गरज नाही. घाबरले म्हणून पळवाट काढली, असा टोलाही त्यांनी लगावला.
ऋतुराज पाटील म्हणाले की, दिवस निवडायचा होता, तर चागंला निवडायचा होता. आम्ही पूर्ण ताकदीने येऊ शकलो असतो. आज जयंतीच्या दिवशी पोस्ट टाकून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला त्यांनी चॅलेंज केलं असेल दोन तास राहिले, एक तास राहिला तर आम्ही शांत बसणार नाही.
त्यांनी पुढे सांगितले की, आम्ही शांतपणे आलो. सव्वा सात ते साडेसातच्या सुमारास आम्ही दसरा चौकात आलो. मात्र, त्यांनी सत्तेचा वापर करून त्यांनी आम्हाला दसरा चौकात थांबवले. भीती नव्हती, तर दुर्लक्ष करायला पाहिजे होते. आम्हाला येऊ द्यायला हवे होते. आम्ही बिंदू चौकातून सांगतो महाडिक कंपनी भ्यालीय, भ्यालीय. घाबरला नाही, तर मग का पळाला तुम्ही? धमक होती तर थांबला का नाही? धमक असती तर अर्ज अपात्र करून दिशाभूल केली नसती. पराभव होत असल्याचे त्यांनी सिद्ध केलं आहे. आमचे परिवर्तन पॅनेल आमचे निवडून येईल.
ऋतुराज पाटील म्हणाले की, महाडिकांकडून दिशाभूल केली जात आहे. त्यांना आम्ही अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यांनी 28 वर्ष कारखाना सांभाळला आहे तर दर का कमी देत आहेत. कारखान्याची निवडणूक लागल्यानंतर आम्ही पॅनेल स्थापन केलं असून आम्ही सातत्याने प्रश्न विचारत आहोत. त्यांनी कारखाना का वाढवला नाही? मयत झालेल्या सभासदांना वारसा हक्क का दिला नाही? सत्तेचा गैरवापर करून त्यांनी 29 उमेदवारांना अपात्र केली. महाडिकांकडून आज जयंतीलाच पोस्ट का टाकण्यात आली? अशीही त्यांनी विचारणा केली.
इतर महत्वाच्या बातम्या