Rajaram Sakhar Karkhana : कोल्हापूरच्या राजकारणात बंटी पाटील विरुद्ध महाडिक गटाच्या वादात आजचा दिवस अभूतपूर्व असा ठरला. बिंदू चौकात येऊन महाडिक भ्याल्याचे सांगतो असे म्हणताच महाडिक गटाकडून माजी आमदार अमल महाडिक यांनीही आजच बिंदू चौकात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे सायंकाळी 7 वाजून 25 मिनिटांनी बिंदू चौकात अमल महाडिक पोहोचल्यानंतर संध्याकाळी सव्वा आठच्या सुमारास पाटील गटाकडून आमदार ऋतुराज पाटील यांचे आगमन झाले. यावेळी सतेज पाटील यांचा एकदा ठरलं की ठरलं कंडका पाडायचा हा बॅनरही त्यावेळी लक्ष वेधून घेत होता. 


तत्पूर्वी, पाटील आपल्या समर्थकांसह येत असताना पोलिसांनी त्यांना दसरा चौकात रोखले. त्यावेळी अमल महाडिक आपल्या कार्यकर्त्यांसह बिंदू चौकात होते. ऋतुराज पाटील यांचे आगमन झाल्यानंतर बाबासाहेबांना अभिवादन करून माध्यमांशी संवाद साधला. बोलत असताना अजाण सुरु झाल्याने त्यांनी काही वेळ थांबून मग प्रतिक्रिया दिली.


आमदार ऋतुराज पाटील म्हणाले की, महाडिकांकडून दिशाभूल केली जात आहे. त्यांना आम्ही अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यांनी 28 वर्ष कारखाना सांभाळला आहे तर दर का कमी देत आहेत. कारखान्याची निवडणूक लागल्यानंतर आम्ही पॅनेल स्थापन केलं असून आम्ही सातत्याने प्रश्न विचारत आहोत. त्यांनी कारखाना का वाढवला नाही? मयत झालेल्या सभासदांना वारसा हक्क का दिला नाही? सत्तेचा गैरवापर करून त्यांनी 29 उमेदवारांना अपात्र केली. महाडिकांकडून आज जयंतीलाच पोस्ट का टाकण्यात आली? अशीही त्यांनी विचारणा केली. 


तत्पूर्वी, बिंदू चौकात माजी आमदार अमल महाडिक यांचे 7 वाजून 25 मिनिटांनी आगमन झाले. अमल महाडिक यांच्यासोबत नाना कदम तसेच कार्यकर्ते होते. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अमल महाडिक यांनी पोहोचताच आज जयंती असल्याने महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. महाडिक यांनी अभिवादन करताच अमल महाडिक यांना पोलिसांना बाजूला नेले. 


यावेळी बोलताना अमल महाडिक म्हणाले की, माझ्या चॅलेंजला त्यांनी उत्तर द्यावे. डी. वाय. पाटील कारखान्याची माहिती द्यावी. त्यांची नीतीमत्ता खोटी आहे. त्यांच्यात दम नाही. ते घाबरले आहेत. आम्हाला बंटी पाटलांना विचारायचं आहे. डी.  वाय. पाटील येतील तेव्हा महादेवराव महाडिक येतील. आम्ही बाकी कोणाशी चर्चा करणार नाही. ते पुढे म्हणाले की, आज जयंती असल्याने मिरवणुका आहेत, पण ज्या पद्धतीने आव्हान दिले म्हणून आलो. कारखाना निवडणूक आहे ही व्यक्तीगत निवडणूक नाही. बंटी पाटील आलेले नाहीत. त्यांच्याकडून होत असलेल्या अप्रचारामुळे त्यांना माहिती देणार आहे. त्यांनी त्यांच्या कारखान्याची माहिती द्यावी. 


इतर महत्वाच्या बातम्या