Rajaram Sakhar Karkhana : राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत सतेज पाटील विरुद्ध महाडिक गटातील वाद टोकाला गेला आहे. सतेज पाटील यांनी गुरुवारी मी 100 टक्के म्हणतो या व्यासपीठावर नव्हे, तर बिंदू चौकात सांगेन, महाडिक भ्यालेत, भ्यालेत, 100 टक्के भ्यालेत. भ्याले नसतील, तर छाननीमध्ये अर्ज उडवण्याचे कारण काय? यानंतर आज महाडिक गटाकडून माजी आमदार अमल महाडिक आजच संध्याकाळी बिंदू चौकात येत असल्याचे आव्हान दिले.
आज कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकात माजी आमदार अमल महाडिक यांचे 7 वाजून 25 मिनिटांनी आगमन झाले. अमल महाडिक यांच्यासोबत नाना कदम तसेच कार्यकर्तेही होते. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अमल महाडिक यांनी पोहोचताच आज जयंती असल्याने महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. महाडिक यांनी अभिवादन करताच अमल महाडिक यांना पोलिसांना बाजूला नेले.
पोलिसांनी बाजूला केल्यानंतर अमल महाडिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना आमदार सतेज पाटील यांच्यावर हल्ला चढवला. ते म्हणाले की, आज जयंती असल्याने मिरवणुका आहेत, पण ज्या पद्धतीने आव्हान दिले म्हणून आलो. कारखाना निवडणूक आहे ही व्यक्तीगत निवडणूक नाही. ते पुढे म्हणाले की, बंटी पाटील आलेले नाहीत. आम्ही वाट पाहत आहोत. त्यांच्याकडून होत असलेल्या अप्रचारामुळे माहिती देणार आहे. त्यांनी त्यांच्या कारखान्याची माहिती द्यावी. माझ्या चॅलेंजला त्यांनी उत्तर द्यावे. डी. वाय. पाटील कारखान्याची माहिती द्यावी. त्यांची नीतीमत्ता खोटी आहे. त्यांच्यात दम नाही. ते घाबरले आहेत. आम्हाला बंटी पाटलांना विचारायचं आहे. डी. वाय. पाटील तेव्हा महादेवराव महाडिक येतील. आम्ही बाकी कोणाशी चर्चा करणार नाही.
इतर महत्वाच्या बातम्या