Kolhapur Weather : कोल्हापूर शहरासह (kolhapur Weather) जिल्ह्यात गेल्या दोन थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. त्यामुळे दिवसभर निरभ्र आकाश असूनही बोचरी थंडी जाणवत आहे. पारा घसरल्याने रात्रीची वर्दळ कमी झाली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी शेकोटीचा आधार घेतल्याचे दिसून आले. कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाळ्यापासून वातावरण पूर्णत: बदलले आहे. रात्री बारापर्यंत 15 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली आल्याने चांगलीच थंडी जाणवली. त्यामुळे ऊसतोड मजुरांना गारठ्यामध्येच रात्र काढावी लागली. गेल्या तीन दिवसांपासून वेगाने पारा वेगाने उतरणीला लागला आहे. तीन दिवस थंडी जाणवल्यानंतर आजपासून पुन्हा वातावरणात बदलाची शक्यता आहे. आजपासून तापमानात वाढ होऊन पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज 


दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात हवामान विभागाकडून पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मंदोस चक्रीवादळामुळे (mandous cyclone) पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 28 नोव्हेंबर रोजी सुद्धा जिल्ह्यातील सिद्धनेर्ली गावासह बामणी, शेंडूर, शंकरवाडी आदी गावात जोरदार अवकाळी पाऊस झाला. सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास सुरू झालेला हा पाऊस रात्री 8 पर्यंत सुरु होता. ऊस तोडणी मजुरांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे या मजुरांचे हाल झाले होते. दुसरीकडे, रब्बी हंगामातील ज्वारी हरभरा व इतर पिकांसाठी हा पाऊस पोषक ठरणार आहे. या पावसामुळं हवेतला गारवा आणखी वाढला आहे. 


परतीच्या पावसाचाही धुमाकूळ 


कोल्हापूर जिल्ह्यात मोसमी पावसाने साथ दिल्याने पुरसदृश्य परिस्थिती उद्भवली नाही. मात्र, परतीच्या पावसाने जिल्ह्यात हाहाकार केला. त्यामुळे जिल्ह्यात उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. ऊस गळीत हंगामास 15 दिवस आधी परवानगी मिळूनही शिवारात पावसाचे पाणी असल्याने वेळेवर सुरु होऊ शकला नाही. शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यात परतीच्या पावसाने मोठा हैदोस घातला.  


ऑक्टोबर महिना कोल्हापूर जिल्ह्यातील पिकांसाठी कर्दनकाळ ठरला होता. ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात पाऊस कमी होणे अपेक्षित असताना तब्बल 129.2 मिमी पाऊस झाला. आजवरची आकडेवारी पाहिल्यास हाच पाऊस 60 मिमीच्या वर पडत नव्हता. यंदा मात्र पावसाने कहरच केला. परतीच्या पावसाने सर्वाधिक कहर कोल्हापूर जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये केला होता. यामध्ये गगनबावडा, पन्हाळा, शिरोळ आणि हातकणंगले (Gaganbavda, Panhala, Shirol, Hatkanaglae) तालुक्यांचा समावेश आहे. गगनबावडा तालुक्यात 282.9 मिमी पाऊस झाला. हातकणंगले तालुक्यात 205 मिमी पाऊस झाला. शिरोळमध्ये 143.9 मिमी पाऊस झाला. पन्हाळा तालुक्यात 163.4 मिमी पाऊस झाला असल्याची माहिती समोर आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या