Rahul Gandhi Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला नांदेडमध्ये प्रवेश करणार आहे. महाराष्ट्रात 16 दिवसांमध्ये 383 किमीचा प्रवास करणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून कोल्हापूरमध्ये शनिवारी काँग्रेसचा मेळावा होणार आहे. काँग्रेस आमदार माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी याबाबत माहिती दिली. भारत जोडो अभियान अंतर्गत हा राज्यातील पहिलाच मेळावा असेल. 


या मेळाव्याला प्रदेश काँग्रेसमधील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. दिग्विजय सिंह, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. शाहू समाधी स्थळाला अभिवादन करून होणार अभियानाची सुरुवात होईल. शनिवारी सायंकाळी 5 वाजता दसरा चौकात काँग्रेस नेत्यांची सभा होईल, अशी माहिती सतेज पाटील यांनी दिली. 


भारत जोडो यात्रा लाईव्ह दाखवण्याचे नियोजन


दुसरीकडे, कोल्हापूर काँग्रेसकडून भारत जोडो यात्रा लाईव्ह दाखवण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सध्या राहुल यांची भारत जोडो यात्रा कर्नाटकमध्ये आहे. कोल्हापूर काँग्रेस कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात स्क्रीनद्वारे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे थेट प्रक्षेपण करणार आहे.


काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कर्नाटकात पोहोचली आहे. यात्रा 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारीतून सुरु झाली असून जम्मू आणि काश्मीरमध्ये तिची समाप्ती होणार आहे. एकूण 3,500 किमीचा प्रवास करून 12 राज्यांमधून ही यात्रा जाईल. संपूर्ण दौरा पूर्ण होण्यासाठी तब्बल 150 दिवस लागतील. 


सात नोव्हेंबरला राहुल यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात 


दरम्यान, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला नांदेडमध्ये प्रवेश करणार आहे. महाराष्ट्रात 16 दिवसांमध्ये 383 किमीचा प्रवास करणार आहे. त्यामुळे काँग्रेसकडून भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रेतून बेरोजगारी आणि ढासळलेली अर्थव्यवस्थेवरून भाजपवर हल्लाबोल करत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या