Ambabai Mandir : श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरामध्ये प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने पुष्पक हायड्रोलिक वाहन अर्पण करण्यात आले आहे. बंगळूर येथील भाविक मेकिपत्ती राजगोपाल रेड्डी यांनी हे वाहन अर्पण केलं आहे. अंबाबाई मंदिरामध्ये प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून वाहन घेण्याचा प्रस्ताव समितीकडून मांडण्यात आला होता. 

Continues below advertisement


सदर गाडीच्या चाव्या आज समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांनी रेड्डी यांच्याकडून स्वीकारल्या. यावेळी व्यवस्थापक महादेव दिंडे, धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लेकर, के. रामराव तसेच देवस्थान समितीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.


अंबाबाई मंदिरात राज्यातून नव्हे, तर देशभरातील भक्त दर्शनात येत असतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा आकडा आता लाखाच्या घरात गेला आहे. या सदर भाविकांकडून अर्पण होणारे हार व फुले तसेच इतर साहित्य मोठ्या प्रमाणात जमा होत असते. त्यामुळे देवीला अर्पण झालेलं साहित्य सुरक्षित बाहेर काढणे अत्यावश्यक आहे. तसेच कमी प्रमाणात मनुष्यबळाचा वापर करण्यासह लाडू प्रसाद व इतर साहित्य मंदिरामध्ये आणण्यासाठी दोन बाईक घेण्याचे समितीच्या वतीने निश्चित करण्यात आले होते.


या योजनेंतर्गत सुमारे 4 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या बॅटरीवर चालणाऱ्या दोन पुष्पक हायड्रोलिक वाहन आज अंबाबाईच्या चरणी बेंगलोर येथील भाविक मेकिपत्ती राजगोपाल रेड्डी यांनी अर्पण केल्या. त्यापैकी पहिली गाडी आज मंदिर परिसरातील लाडू वाहतूक करण्याच्या सेवेसाठी रुजू करून घेण्यात आली.


इतर महत्त्वाच्या बातम्या