Gokul AGM : गोकुळ तसेच राज्यांमध्ये झालेल्या सत्तांतरानंतर प्रथमच कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा 29 ऑगस्ट रोजी होत आहे. या सभेकडे दूध उत्पादकांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. सत्ताधारी तसेच विरोधक अशा दोन्ही गटांकडून या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. 


दरम्यान, आज विरोधकांचा मुकाबला करण्यासाठी सत्ताधारी गटाकडून रणनीती ठरवण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर बोलताना गोकुळमधील सत्ताधारी आघाडीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, शेवटच्या सभासदाचे जोवर समाधान होत नाही तोपर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरे दिले जातील. 


कोणत्याही प्रकारे अचानक सभा संपवण्यासाठी आम्ही राष्ट्रगीत वाजवणार नसल्याचे सांगत महाडिक गटाला टोला लगावला. दरम्यान, पुढे बोलताना सांगितले की, सत्तेत आल्यापासून आम्ही संघाच्या आणि दूध उत्पादकांच्या हिताचेच आजवर निर्णय घेतले आहेत. आम्ही आश्वासन दिल्याप्रमाणे गाय आणि म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरात वाढ केली आहे.  11 कोटींची बचत झाल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. 


सत्तांतरानंतर प्रथमच वार्षिक सर्वसाधारण सभा


गेल्यावर्षी गोकुळमधील माजी आमदार महादेवराव महाडिक आणि पी. एन. पाटील यांची 25 वर्षांची सत्ता उलथवून  टाकताना सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी४ एकहाती सत्ता मिळवली होती. मात्र आता राज्यामध्ये झालेल्या सत्तांतरामुळे तसेच धनंजय महाडिक खासदार झाल्याने महाडिक गट पुन्हा एकदा प्रबळ झाल्याने गोकुळच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा हालचाली होत आहेत. 


दोन्ही गटाकडून यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांकडून वार्षिक सर्वसाधारण सभेची तयारी सुरू असतानाच विरोधी गटाकडूनही बैठकीसाठी चांगली तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक तसेच माजी आमदार आम्हाला महाडिक यांनी विरोधी संचालक व समर्थकांच्या बैठकांचा जोर लावला आहे.


सत्तांतरानंतर वर्षभरामध्ये संघाचा कारभार, दू संकलन, कर्मचाऱ्यांच्या बदल्या, दूध दरवाढ आधी प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना कसे घेरता येईल याबाबत रणनीती आखली जात आहे. विश्वास पाटील  यांचे सत्ताधारी  गटाला जाऊन मिळणे हे सुद्धा महाडिक गटाला जिव्हारी लागणारे होते. राज्यसभेमध्ये महाडिक यांचा विजय झाल्याने महाडिक गटाचा आत्मविश्वास चांगला दुणावला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या