Panhala Hill Half Marathon : डेक्कन स्पोर्ट्स क्लब व शांतिनिकेतन स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित "पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन" स्पर्धा रविवारी 28 ऑगस्ट रोजी होत आहे. या स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. दिल्ली, लातूर, सोलापूर, हुबळी, धारवाड, बेळगाव, नाशिक, सांगली, विटा अशा विविध ठिकाणच्या 1500 स्पर्धकांनी नाव नोंदणी केल्याची माहिती डेक्कन स्पोर्ट्स क्लबचे समीर नागठिळक, जयेश कदम,उदय पाटील, आयर्नमॅन वैभव बेळगावकर, राजीव लिंग्रस, समीर चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. पन्हाळा हा ऐतिहासिक गड जपा व त्याचे पावित्र्य राख असा संदेश मॅरेथॉन मधून दिला जाणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन रविवारी सकाळी ६ वाजता मालोजीराजे छत्रपती, जिल्हाधिकारी राहुल रेखावर, डी.वाय पाटील मेडिकल कॉलेजचे संजय. डी. पाटील, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे,आमदार विनय कोरे यांच्या हस्ते होणार आहे. शिवाय या मॅरेथॉनमध्ये 25 शासकीय अधिकारी सहभागी होणार आहेत.
मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर असे असेल
स्पर्धा ही सकाळी 6 वाजता सुरू होणार आहे. ही मॅरेथॉन 21, 11 व 5 किलोमीटर अंतराची आहे. यातील २१ किलोमीटर स्पर्धा ही सकाळी 6 वाजता तबक उद्यान पन्हाळा येथून सुरु होणार आहे. ती बाजीप्रभू देशपांडे पुतळा, वाघबीळ,पुन्हा बाजीप्रभू देशपांडे पुतळा,लता मंगेशकर बंगला,पावनगड, पुन्हा बाजीप्रभू देशपांडे पुतळा,पुसाटी बुरुज,जाधव बंगला, सज्जाकोटी परत तबक उद्यान येथे समाप्त अशी होणार आहे.
तर 11 किलोमीटर अंतराची मॅरेथॉन ही तबक उद्यान येथून सुरू होऊन ती बाजीप्रभू देशपांडे पुतळा नरवीर शिवा काशीद पुतळा पुन्हा बाजीप्रभू देशपांडे पुतळा, लता मंगेशकर बंगला, पावनगड, बाजीप्रभू देशपांडे पुतळा,पुसाटी बुरुज, जाधव बंगला,सज्जाकोटी परत तबक उद्यान समाप्त होणार आहे. 5 किमी तबक उद्यान येथून सुरू होऊन ती बाजीप्रभू देशपांडे पुतळा नरवीर शिवा काशीद पुतळा,पुन्हा बाजीप्रभू देशपांडे पुतळा, पुसाटी बुरुज,जाधव बंगला,सज्जाकोटी परत तबक उद्यान अशी होणार आहे.
मॅरेथॉनचे वयोगट असे आहेत
या हाफ मॅरेथॉन मधील 5 किलोमीटर मॅरेथॉनमध्ये 13 वर्षांपासून पुढील वय व 11 किलोमीटरची मॅरेथॉन ही 16 वर्षांपासून पुढील वय आणि 21.1 किलोमीटरची मॅरेथॉन ही 18 वर्षांपासून पुढील सर्व वयोगटातील स्पर्धकांसाठी आहे.
इतर महत्वाच्या बातम्या