कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेली कोल्हापूर विमानतळावरून (Kolhapur Aiprort) कोल्हापूर ते दिल्ली थेट विमानसेवेचा निर्णय झाल्यानंतर आता कोल्हापूर ते गोवा विमानसेवा सुद्धा सुरु होणार आहे. 19 आणि 22 सप्टेंबर रोजी दोन दिवस विशेष विमानसेवा असेल. मार्गावरून सर्व अडथळे पार पडल्यास तासाभरात कोल्हापुरातून गोव्याला पोहोचणं शक्य होणार आहे. 


गोव्याला आणि ते सुद्धा कोल्हापूरमधून? दोन दिवसांचा मुहूर्त ठरला! 


कोल्हापूर ते गोवा(मोपा)


सकाळी 11.30 ते 12.30
19.09.24 - 3750/-
22.09.24 - 3250/-


गोवा(मोपा) ते कोल्हापूर


दुपारी 01.00 - 02.00
19.09.24 - 3250/-
22.09.24 - 3750/-


फक्त 2 दिवसांसाठी स्टार एअरचे विमान असेल 


आठवड्यातील दोन दिवस कोल्हापूर-गोवा विमानसेवा 


कोल्हापूर-गोवा या मार्गावर विमानसेवा सुरू व्हावी, अशी मागणी सातत्याने होत होती. त्यामुळे ती पूर्णत्वास जात आहे. गोवा-कोल्हापूर आणि कोल्हापूर-हैदराबाद, हैदराबाद कोल्हापूर आणि कोल्हापूर-गोवा अशी ही दैनंदिन सेवा सुरू होईल, यादृष्टीने नियोजन केले जात आहे. त्यामुळे आणखी एक विमान कंपनी कोल्हापूरशी जोडली जाणार आहे. कोल्हापूर ते गोवा विमानसेवा सुरु झाल्यास कोल्हापूर ते गोवा हे अंतर अवघ्या एका तासात गाठता येणार आहे.


सध्या कोल्हापूर-हैदराबाद मार्गावर एक विमानसेवा सुरू आहे. दुसरीकडे, खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी येत्या 27 ऑक्टोबरपासून कोल्हापूर ते दिल्ली या मार्गावर विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे कोल्हापूर विमानतळाचा आणखी एक मैलाचा दगड गाठला गेला आहे.


नागपूर आणि गोव्यासाठी विमान लवकरच सुरु होणार


त्याशिवाय कोल्हापूर आणि नागपूर (Nagpur) मार्गावर सुद्धा विमान सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. कोल्हापूर ते दिल्ली या मार्गावर इंडिगो कंपनीचे सुमारे 180 आसन क्षमतेचे विमान कोल्हापूर- दिल्ली-कोल्हापूर या मार्गावर उड्डाण करणार आहे. कोल्हापूर-दिल्ली-कोल्हापूर या मार्गावर हवाई सेवा सुरू होण्याचा प्रस्ताव भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या महासंचालकानाकडे अंतिम टप्प्यात आहे. 


कशी असेल विमानाची वेळ?


दरम्यान, सकाळी 10 वाजून दहा मिनिटांनी दिल्लीतून विमान उड्डाण करेल आणि दुपारी 12:55 मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर पोहोचेल. त्यानंतर 01:25 मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावरून उड्डाण होईल आणि सायंकाळी चार वाजून 15 मिनिटांनी विमान दिल्लीला पोहोचेल. 


इतर महत्वाच्या बातम्या