Kolhapur News : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नऱ्हे आंबेगावजवळ स्वामी नारायण मंदिराच्या उतारावर आज मध्यरात्री दोनच्या सुमारास ट्रक आणि खासगी बसचा (23 एप्रिल) भीषण अपघात झाला. या अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील माय लेकरासह तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पन्नाशीतील अनोळखी पुरुषासह, रवींद्र वासुदेव कोरगावकर (वय 47, रा. दाजीपूर, ता. राधानगरी जि. कोल्हापूर) सुवर्णा वासुदेव कोरगावकर (वय 83 रा. दाजीपूर, ता. राधानगरी जि. कोल्हापूर) आणि नीता प्रमोद भाटकर (वय 36, रा. शास्त्रीनगर, कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत. मृतामध्ये रवींद्र आणि आणि सुवर्णा हे माय लेकरं आहेत. त्यामुळे राधानगरी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. जखमींमध्ये कोल्हापुरातील तिघांचा समावेश आहे. ते राजेंद्रनगर आणि सानेगुरुजी वसाहतमधील आहेत. आधिरा प्रमोद भास्कर ( वय 6, रा. शास्त्रीनगर, कोल्हापूर) जयश्री अशोक देसाई (वय 53, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) आणि स्मिता रामचंद्र जहांगिरदार (वय 52 रा. साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. 


फक्त सहा महिन्यात आई, वडील आणि मुलाचा मृत्यू 


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मयत रवींद्र कोरगावकर पोस्ट खात्यात नोकरीस होते. त्यांची अलीकडेच मुंबईत बदली झाली होती. ते पत्नी आणि दोन मुलींसह मुंबईस वास्तव्यास होते. मुंबईत नुकताच नवीन फ्लॅट घेतल्याने तो आईला दाखवण्यासाठी दाजीपूरहून मुंबईला जात असताना काळाने माय लेकरांवर घाला घातला. स्लीपर कोच असलेल्या खासगी गाडीत ते मागील बाजूस होते. झोपेत असतानाच अपघात झाला. त्यामुळे त्यांचा झोपेतच बळी गेला. दुर्दैवाचा फेरा म्हणजे मयत रवींद्र यांच्या वडिलांचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे सहा महिन्यात आई, वडील आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. 


अपघात कसा झाला? 


मध्यरात्रीच्या सुमारास ट्रकने खासगी ट्रॅव्हलच्या बसला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. ही खासगी बस (एमएच-03-सीपी-4409) नीता ट्रॅव्हल्स कंपनीची आहे. ही बस कोल्हापूर ते डोंबिवली असा प्रवास करत होती. मध्यरात्री दोनच्या सुमारास नऱ्हे आंबेगाव परिसरात असणाऱ्या स्वामी नारायण मंदिराजवळ हा अपघात झाला. बसमधील प्रवासी गाढ झोपेत असताना अपघात झाला. ज्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलाचाही समावेश आहे. अपघातात 22 प्रवासी जखमी झाले असून ते जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या