Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये 15 ते 20 टक्के अतिरिक्त पाणीसाठा आहे. राधानगरी धरणाचे उपअभियंता प्रवीण पारकर म्हणाले की, “राधानगरी (Radhanagari dam) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन आठवड्यांपासून मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे धरणात 69 टक्के पाणीसाठा झाला आहे.
राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात 24 तासांत 133 मिमी पाऊस झाला आहे.
पारकर पुढे म्हणाले की, राधानगरी तालुक्यातील राधानगरी धरण, काळम्मावाडी धरण, तुळशी धरण क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी 400 मिमी जास्त पाऊस झाला आहे. हीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर धरणांची आहे. धरणातील पाण्याचा साठा पुरेसा ठेवण्याचा आमचा मुख्य हेतू आहे आणि त्यानुसार पाण्याचा विसर्ग करण्यासाठी मोजकीच जोखीम पत्करली आहे, जेणेकरून पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्यास, राधानगरी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पूरस्थिती निर्माण होणार नाही.
राधानगरी धरण परिसरात गेल्या वर्षी 1,356 मिमी पाऊस झाला होता, तर यावर्षी 15 जुलैपर्यंत 1,809 मिमी पाऊस झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला
गेल्या आठवडाभर कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात पावसाने धूमशान घातल्यानंतर गेल्या 48 तासांपासून जोर ओसरला आहे. त्यामुळे पुराचा धोका टळला आहे. पंचगंगा नदी (Panchganga River) पाणी पातळीत चढउतार होत आहे. अलमट्टी धरणातूनही पाण्याचा विसर्ग कालपासून मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे.
जिल्ह्यातील अजूनही 61 बंधार पाण्याखाली
कोल्हापूर जिल्ह्यात पुराचा जोर ओसरू लागला असला, तरी अजूनही जिल्ह्यातील 61 बंधारे पाण्याखाली आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. पावसाचा जोर दोन दिवसांपासून कमी असल्याने पाणी वेगाने कमी होईल, अशी आशा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
- Shivsena : 'शिवसेनेतून गेले ते बेन्टेक्स, राहिले ते सोनं' म्हणणारे खासदार मंडलिक शिंदे गटात?
- Balasaheb Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कोल्हापूरमधील स्वप्नाला अवघ्या अडीच वर्षात सुरुंग!
- Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका सुद्धा लांबणीवर, राज्य सरकारचा आदेश