Kolhapur Crime : कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यामध्ये सावकारी किती बोकाळली आहे आणि त्यांची दहशत कोणत्या स्तराला गेली आहे, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. कोल्हापूर शहराला (Kolhapur Crime) लागूनच असलेल्या नदीपलीकडील गावामधील महिलेला कर्जाच्या बदल्यात वेश्या व्यवसाय करायला भाग पाडू, अशी धमकी सावकाराने दिल्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घर बांधण्यासाठी घेतलेल्या 25 लाख रुपयांच्या बदल्यात  सावकाराने 85 लाख रुपयांची मागणी केली आहे. पैसे द्या, अन्यथा वेश्या व्यवसाय करायला भाग पडू, अशी धमकी दिली आहे. त्या महिलेची कारसुद्धा या गुंडांनी ताब्यात घेतली असून घरही नावावर करून घेतलं आहे. घरातून बाहेर पडा, अन्यथा महागात पडेल अशा धमक्या दिल्या जात आहेत. दररोज येऊन आपलं प्रापंचिक साहित्य घराबाहेर टाकण्यात टाकले जात असल्याचे पीडित महिलेनं म्हटलं आहे. 


दररोज गुंडांकडून धमकी


महिलेने दिलेल्या माहितीनुसार, दररोज तिच्या घरामध्ये 10 ते 12 गुंठांना पाठवलं जातं. धमकी दिली जाते. मात्र, पोलिसांकडे तक्रार देऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही, असं त्या महिलेचे म्हणणं आहे. या महिलेच्या घरी पुरुष आणि महिला गुंडसुद्धा जात असल्याने पीडित महिला त्रस्त झाली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, गावच्या सरपंचांनीसुद्धा या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची भूमिका न घेतल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 


सावकार कोल्हापूर शहरातील जवाहर नगर परिसरातील असून ही महिला कोल्हापूर शहराला लागून असलेल्या एका गावामधील आहे. या महिलेला गेल्या अनेक दिवसांपासून सावकाराच्या गुंडांकडून त्रास दिला जात आहे. प्रापंचिक साहित्य रस्त्यावर टाकणे, घराबाहेर पडण्याची धमकी देणे, अशा प्रकारचा मानसिक त्रास या महिलेला दिला जात आहे. पोलिसांकडे दाद मागूनही कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नसल्याची भावना या संबंधित महिलेने व्यक्त केली आहे. त्यामुळे या महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरातून बाहेर पडा, अन्यथा महागात पडेल अशा धमक्याही त्यांना या गुंडांकडून दिल्या जात आहेत. या गावगुंडांमुळे त्रस्त झालेल्या महिलेने आता न्यायाची मागणी केली आहे.


महत्वाच्या इतर बातम्या :


Kolhapur Football: मैदानात, प्रेक्षक गॅलरीत हाणामारी, पोलिसांकडून शिवाजी-प्रॅक्टिस संघातील खेळाडू, हुल्लडबाजावंर गुन्हे दाखल