Kolhapur Municipal Corporation : चंबुखडी उपकेंद्रातील देखभाल कामासाठी उद्या सोमवारी (ता. 30) शिंगणापूर जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील ए, बी व ई वॉर्ड, संलग्न उपनगरात शिंगणापूर योजनेतून पाणीपुरवठा होणार नाही. मंगळवारीही (ता. ३१) कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.


यामध्ये ए, बी, वॉर्ड त्यास संलग्न उपनगरे, ग्रामीण भाग व शहरातंर्गत येणाऱ्या संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरूजी वसाहत, राजेसंभाजी, क्रशरचौक, आपटेनगर टाकी, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, जरगनगर, क्रांतीसिंहनाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, शिवाजी पेठ, चंद्रेश्वरगल्ली, तटाकडील तालीम, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाद्वार रोड, संपूर्ण मंगळवार पेठ, विजयनगर, संभाजीनगर, टिंबर मार्केट परिसर, मंडलिक वसाहत, मंगेशकर नगर, सुभाषनगर पंपिंगवरील अवलंबून असणारा परिसर, शेंडापार्क टाकीवरील अवलंबून असणारा परिसर, जवाहरनगर, वाय पी पोवार नगर परिसर मिरजकर तिकटी याचा समावेश आहे.


त्याचप्रमाणे संपूर्ण राजारामपुरी 1 ली ते 13 वी गल्ली, मातंग वसाहत, यादवनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, राजारामपुरी एक्स्टेंन्शन, टाकाळा, पांजरपोळ, सम्राटनगर, दौलतनगर, शाहूनगर, राजेंद्रनगर, इंगळे मळा, वैभव सोसायटी, शांतीनिकेतन, ग्रीनपार्क, शाहुपूरी 1 ली ते 4 थी गल्ली, व्यापारपेठ, शिवाजी पार्क, रूईकर कॉलनी, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, लिशा हॉटेल, महाडिक वसाहत. या भागातील नागरिकांना उद्या पाणीपुरवठा होणार नाही. या भागातील नागरीकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या (Kolhapur Municipal Corporation) पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या