Rajaram Sakhar Karkhana : श्री छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने उतरूनही एकतर्फी पराभवाला सामोरे जावं लागल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी पराभव मान्य केला आहे. वाढीव सभासदांमुळे पराभव झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण आम्ही आमचा पराभव मान्य केला असून या निवडणुकीत प्रचाराची पातळी खाली गेली ती जायला नको होती, असेही ते म्हणाले. सत्ताधाऱ्यांनी जी आश्वासन दिली त्या पूर्ण करावीत, असेही त्यांनी सांगितले. पराभवाने आम्ही थांबणार नसून कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणार आहे. दोन दिवसांत थेट पाईपलाईनची पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीत प्रचाराची पातळी घसरल्याचे त्यांनी मान्य केले.   


सतेज पाटील (Satej Patil on rajaram sakhar karkhana result) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही त्याची काही कारणं आहेत. आमचे तगडे उमेदवार जाणीवपूर्वक बाद करण्यात आले. बाहेरचे काही वाढीव सभासद असल्याने हा पराभव झाला. पण आम्ही आमचा पराभव मान्य केला आहे. या निवडणुकीत प्रचाराची पातळी खाली गेली, ती जायला नको होती. ते पुढे म्हणाले की, आमच्यावर विश्वास दाखवणाऱ्या सभासदांच्या पाठीशी कायम राहणार आहे. पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना अपेक्षित मतदान झालं नसल्याचा दावा केला. वाढीव सभासद हाच मुद्दा महत्वाचा ठरला आहे. खोटे आधारकार्ड तयार करून मतदान करण्यात आलं. खोटे आधारकार्ड असलेले 200 मतदार मागे गेले. कसबा बावड्यात गेल्यावेळी मतं मिळाली तितकीच मतं मिळाली. मृत सभासदांचे शेअर्स ट्रान्स्फर केले नाहीत, नाहीतर आणखी मतं वाढली असती.



या निकालानंतर आत्मपरीक्षण करणार असल्याचेही ते म्हणाले. उत्तराला प्रत्युत्तर दिलं नसल्यास संभ्रम निर्माण होतो. मात्र, दुर्दैवाने प्रचाराने पातळी खालावली. आरोप प्रत्यारोपांमुळे निवडणूक वेगळ्या वळणावर गेली हे अपेक्षित नव्हते. सत्ताधाऱ्यांनी निर्णयांची अंमलबजावणी करावी. मयत सभासद ट्रान्सफर करावेत. निवडणुकीत पैशाचा वापर झाला की नाही त्यांनी सांगावं. जे झालं त्याला सामोरे जाणार आहेत. पाठिशी असलेल्या सभासदांना न्याय देण्याचे काम करणार आहोत. मते वाढवूनही मताधिक्य वाढलेलं नसल्याचे पाटील यांनी सांगितले. 1200 ते 1300 मताधिक्य त्यांना मिळाले. त्यांना वाढीव सभासदांचा फायदा झाला. खोटी आधारकार्ड करून मतदान झालं, शिरोली, पट्टणकोडीलीत असं झालं. त्यामुळे याबतीत आधारकार्डची सत्यता तपासण्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या अॅपची सक्ती करावी, यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगतिले. 


इतर महत्वाच्या बातम्या