कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी कोल्हापूरचे (Kolhapur News) पालकमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच कोल्हापूरच्या अनुषंगाने असलेल्या विविध मुद्द्यांवर भाष्य केले. त्याचबरोबर विकासकामांचा आढावा देखील घेतला. यावेळी त्यांनी बोलताना विविध विषयांवर भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, कालावधी कमी आहे मात्र, अनेक मर्यादा आहेत. कोल्हापूरच्या विकासासाठी मी कठोर गोष्ट घेणार आहे. अजित पवार यांनी कृषी विद्यापीठाची जागा आयटी पार्कसाठी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात दोन ते अडीच लाखांवर नोकऱ्या तयार होतील असा अहवाल आहे. 


नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बोलताना सांगितले की, नवरात्रोत्सवात लाखो भावी कोल्हापूरमध्ये येतात. त्यामुळे या नवरात्रोत्सवाचे नियोजन योग्य पद्धतीने केलं जाईल. नवरात्रोत्सवामध्ये कोल्हापूर शहरातील रस्ते चकाचक करण्याच्या सूचना दिल्या आहेत असे ते म्हणाले. अंबाबाई मंदिर विकास आराखडा, खंडपीठ प्रश्न मार्गी लावायचे आहेत. मला 10 महिन्यांचा कालावधी मिळाला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकरी संघाच्या इमारतीची देवस्थान समितीला किती गरज आहे हे पाहून निर्णय घेऊ असे त्यांनी यावेळी सांगितले. 


राजकारणाच्या ठिकाणी राजकारण 


दरम्यान, हसन मुश्रीफ शरद पवार गटात गटातून बाहेर पडल्याने कोल्हापुरातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. मुश्रीफ यांची सतेज पाटील (Hasan Mushrif on Satej Patil) यांच्यासोबत असलेली मैत्री सुद्धा सर्वश्रुत आहे. ते म्हणाले की, मैत्रीच्या ठिकाणी मैत्री आणि राजकारणाच्या ठिकाणी राजकारण असतं. येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ कोणासोबत आहेत हे लक्षात येईल. सहकार आणि इतर संस्थेच्या ठिकाणी सतेज पाटील आणि आम्ही एकत्र आहोत. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला कोणासोबत आहे हे लक्षात येईल. 


निधीबाबतीत कोणावरही अन्याय होणार नाही


दरम्यान भाजपकडून कोल्हापूर जिल्ह्यात निधी वाटपाबाबत भाजपकडून भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, निधीबाबतीत कोणावरही अन्याय होणार नाही. सर्वांना समान निधी दिला जाईल. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा विषय सुद्धा तातडीने संपवावा लागणार आहे. थेट पाईपलाईन योजनेचा आढावा पालिकेत जाणार आहे. औषध आणि रिक्त पदांबाबत दोन आठवड्यांमध्ये शपथपत्र देण्यास सांगण्यात आलं आहे. सीपीआरमध्ये कोणालाही बाहेरून औषध आणण्यास सांगू नये अशी सूचना केल्याचे ते म्हणाली. 


अलमट्टी धरणाच्या उंचीवर म्हणाले 


आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाबाबत कर्नाटकच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटावं लागेल. जर त्यांनी आमची भूमिका मान्य केली नाही तर आंदोलन करावं लागेल. 


इतर महत्वाच्या बातम्या