कोल्हापूर : कसबा बावड्यातील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) पूर्णाकृती पुतळा स्मारकाचे भूमीपूजन संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांना आगामी शिवराज्यभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर 6 जूनला पुतळा पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करण्याचा अल्टीमेटम दिला. शाहू महाराजांच्या जन्मस्थळी कसबा बावड्यामध्ये हा कार्यक्रम होत आहे, कसबा बाववड्याचं नाव शाहू महाराजांनी जगभर नेलं. लक्ष्मी विलास पॅलेसच्या माध्यमातून आणि पुतळ्याच्या माध्यमातून देखील जगभर आपल्या गावाचं नाव होणार आहे असल्याचे ते म्हणाले. यावेळी डी. वाय. पाटील समूहाचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील साहेब, आमदार जयश्री जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत होते. 


वटमुखत्यात कुणाला तरी द्यावं लागतं


सतेज पाटील म्हणाले की, पुतळ्याच्या कामावर माझं लक्ष असेलच, पण ऋतुराज पाटलांनी जबाबदारी घ्यावी. फुल टाइम कुणाला तरी वटमुखत्यार द्यावे लागते ते ऋतुराज पाटलांकडे आम्ही दिलं आहे. ते पुढे म्हणाले की, हा पुतळा लवकर झाला पाहिजे, काम चांगलं झालं पाहिजे, बारकावे नीट बघितले पाहिजेत. अगदी दगड कोणता वापरायचा, सगळं काय करायचं सगळं नियोजन ऋतुराज पाटील आणि मूर्तीकार सतीश घाडगे यांची जबाबदारी असेल.



कोणत्याही परिस्थितीत रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा


सतेज पाटील यांनी सांगितले की, श्रीराम सोसायटीमध्ये बैठकीत देशातले लोक बघायला येतील असा पुतळा झाला पाहिजे, असे म्हटले होते. तो शब्द निश्चित ऋतुराज पाटलांच्या माध्यमातून पूर्ण होईल हा विश्वास माझा आहे. पुतळा समितीला विनंती आहे की, सहा जूनच्या आधी पुतळ्याचा अनावरण आपल्याला करता आलं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा. आजच काम चालू करा 60-70 दिवस तुमच्याकडे आहेत.  


छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये एवढे किल्ले जिंकले आपल्याला फक्त पुतळा उभा करायचा आहे. त्यामुळे सगळ्यांना माझी विनंती आहे की दररोज दिवसातील दोन तास चार तास इथे या. काम कसा चालल आहे पाहून घ्या. जसं आता प्रत्येक किल्ल्यावरून पाणी आणलं, माती आणली तसं प्रत्येक दगड बसताना शिवाजी महाराजांवर प्रेम करणारा मावळा तिथे उपस्थित असला पाहिजे. प्रत्येक दगडाला त्यानं बघितलं पाहिजे. प्रत्येक दगडामध्ये एक नवा इतिहास घडला पाहिजे. तो दगड नसेल तर भविष्यकाळातील पिढीला या ठिकाणी प्रेरणादायी स्मारक असणार ही काळाची गरज आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या