कोल्हापूर : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार की काय? अशी चर्चा रंगली असतानाच आता महायुतीमधील (Kolhapur Loksabha) आणखी खदखद समोर आली आहे. कोल्हापूर विमानतळाचे (Kolhapur Airport) आज (10 मार्च) पीएम मोदींच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीमधील आमदार आणि खासदार सुद्धा उपस्थित होते. यावेळी विमानतळाची पाहणी करताना महायुतीला पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करत व्यथा मांडल्या. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना महायुतीला पाठिंबा देणारे आमदारच नाराज असल्याने राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत. 


चर्चेत सामावून घेतले नसल्याची तक्रार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन दिवसात दोनवेळा कोल्हापूर दौरा केल्याने सुद्धा राजकीय भूवया उंचावल्या आहेत. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांची उमेदवारी धोक्यात असल्याने शिंदे यांनी दोघांसाठी बळ लावले असताना महायुतीमधील नाराजी समोर आली आहे. भाजपकडून दोन्ही मतदारसंघावर थेट दावा करताना कोल्हापुरात समरजितसिंह घाटगे आणि हातकणंगलेत ताकदीच्या उमेदवाराची चाचपणी सुरु आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ महायुतीमधील बोलून नाराजी व्यक्त केली.  


एका आमदाराची भाजपकडून हातकणंगले लोकसभेसाठी चाचपणी


या तिन्ही आमदारांनी  लोकसभा निवडणुकीच्या चर्चेत सामावून घेतले नसल्याची तक्रार मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली. यामधील तीनपैकी 2 आमदारांनी दिला भाजपला समर्थन दिलं आहे. एका आमदाराने शिंदेंना पाठिंबा दिला आहे. इतकंच भाजपला पाठिंबा दिलेल्या दोनपैकी एका आमदाराची भाजपकडून हातकणंगले लोकसभेसाठी चाचपणी सुरु आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे केलेली तक्रार आणि वेळ यावरून राजकीय भूवया उंचावल्या आहेत. 


धनजंय महाडिक काय म्हणाले


दरम्यान, तिन्ही आमदारांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे जाहीर नाराजी बोलून दाखवल्याने खासदार धनंजय महाडिक यांनी प्रतिक्रिया दिली. या आमदारांच्या नाराजीबाबत लवकरच वरिष्ठांसोबत बोलू, अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली.


दुसरीकडे, भाजपकडून कोल्हापूर आणि हातकणंगले पिंजून काढण्यात येत असताना शिंदे गटानं सुद्धा गेल्या कोल्हापूरवर लक्ष केंद्रित केलं आहे. शिंदे गटाचे अधिवेशन कोल्हापूरमध्ये पार पडलं. मुख्यमंत्र्यांचे सुद्धा दौऱ्यावरती दौरे सुरू आहेत. एक दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा पार पडला. मात्र, असे असूनही कोल्हापूरची जागा शिंदे गटाला मिळणार की नाही? याची चर्चा आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या