Kolhapur Mahavitaran Strike : खासगीकरणाच्या विरोधात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून 72 तासांचा संप पुकारला आहे. दरम्यान, संपाच्या पहिल्या 12 तासांमध्ये कोणताही मोठा परिणाम कोल्हापूर जिल्ह्यात जाणवला नाही. कोल्हापूर शहरातील औद्योगिक वसाहत असलेल्या शिवाजी उद्यमनगरमध्ये सकाळपासून दोन तीनवेळा वीज गेली आणि आली असा प्रकार घडला. वाय. पी. पोवारनगरमध्ये एका लाईनमध्ये दुपारच्या सुमारास वीजपुरवठा खंडीत झाला. मात्र, पुरवठा सुरळीत केला जाईल, असे सांगण्यात आले.


दुसरीकडे, इचलकरंजी शहरात महावितरण कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाच्या (Kolhapur Mahavitaran Strike) विरोधात महावितरण कार्यालयासमोर निदर्शने केली. तोडगा न निघाल्यास 18 जानेवारीपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला. खासगीकरणाच्या विरोधात महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपन्यातील अधिकारी आणि कर्मचारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून संपावर गेले आहेत. 


अदानी उद्योग समूहाला वीज वितरणचा परवाना देण्यास विरोधासह विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे चार हजार कर्मचारी 72 तासांच्या संपावर गेले आहेत. इचलकरंजी वस्त्रोद्योग पूर्णत: वीजेवर विसंबून असल्याने तोडगा निघाला नसल्यस मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. इचलकरंजी शहर व ग्रामीण भागातील काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे संप मिटावा अशी मागणी होऊ लागली आहे.


पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज 


दरम्यान, वीज पुरवठ्याबाबत कोणत्याही चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज आहे. तक्रारी किंवा शंका असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन महावितरणकडून (Kolhapur Mahavitaran Strike) करण्यात आलं आहे. संपकाळात वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी महावितरणने नियुक्त केलेल्या एजन्सीचे कामगार, कंत्राटी कामगार, सेवानिवृत्त झालेले अभियंता व कर्मचारी यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत निरीक्षक व महाऊर्जा विभागातील अभियंत्यांना विविध उपकेंद्राच्या ठिकाणी नेमण्यात आले आहे. महावितरणतर्फे नियुक्त ज्या एजन्सी संप काळात काम करणार नाहीत, त्यांना तत्काळ बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आला आहे.


वीज कंपन्यांच्या संपामुळे औद्योगिक वसाहतीमधील वीज ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.औद्योगिक संघटनांना किंवा मोठ्या प्रमाणात वीज वापर करणाऱ्या‍ ग्राहकांना वीज कंपनीने कोणतीही पूर्वसूचना दिली नसल्याने अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. (Kolhapur Mahavitaran Strike)


इतर महत्वाच्या बातम्या