Sharad Pawar : भाजपच्या (Bjp) विरोधात जे पक्ष जातील त्यांची फोडाफोड कशी करता येईल हीच सत्ताधारी पक्षाची भूमिका असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)) यांनी व्यक्त केले. तुमचा विचार सोडा आणि आमच्याकडे या ही भूमिका सत्ताधारी पक्षाची आहे. काही लोकांना ईडी, सीबीआयचा वापर करुन सहा सहा महिने तुरुंगात टाकले. महाराष्ट्रात सुद्धा अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. सत्तेचा गैरवापर करुन विरोधकांना नामोहरण करण्याचा कार्यक्रम सत्ताधाऱ्यांनी हाती घेतल्याचे पवार म्हणाले. आम्ही याच्या विरोधात एकत्र लढू असे शरद पवार म्हणाले.


शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील पाच महत्वाचे मुद्दे


1) राज्यात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. अनेक ठिकाणी पाण्याची कमतरता असल्याचे शरद पवार म्हणाले. विदर्भातील काही जिल्ह्यात पीकं संकटात आली असल्याचे शरद पवार म्हणाले. त्याची काळजी तातडीनं सरकारनं घेतली पाहिजे असे पवार म्हणाले. पिण्याचं पाणी, जनावरांचा चारा, लोकांच्या हाताला काम, शेतकऱ्यांची वसुली थांबवली पाहिजे या गोष्टी सरकारनं केल्या पाहिजेत असे पवार म्हणाले. 


2) या सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या नाहीत. निवडणुका घेतल्या तर जनमत काय आहे हे स्पष्ट होईल, त्यामुळं निवडणुका पुढं ढकलण्याचे काम सरकार करत असल्याचे शरद पवार म्हणाले.
   
3) 2024 च्या लोकसभा निवडणुका सामुदायिकपणाने कशा लढवता येतील याचा आढावा मुंबईत होणाऱ्या बैठकीत घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान, झारखंड, पंजाब, दिल्ली पश्चिम बंगाल या राज्यांचे मुख्यमंत्री हजर राहतील असे पवार म्हणाले. तसेच 16 राजकीय पक्षाचे अध्यक्ष या बैठकीला हजर राहणार असल्याचे शरद पवार म्हणाले. 


4) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून गेलेले कोण काय मत मांडतात हा त्यांचा अधिकार असल्याचे शरद पवार म्हणाले. 
मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे. तर जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत. पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आम्हा दोघांना असल्याचे शरद पवार म्हणाले. 


5) मणिपूरचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महत्वाचा वाटत नसेल, असे शरद पवार म्हणाले. तेथील स्त्रियांची सुरक्षा, त्यांची धिंड काढल्याच्या घटना घडत होत्या, त्या गोष्टी पंतप्रधानांना महत्वाच्या वाटत नसतील असे शरद पवार म्हणाले. या गोष्टीची त्यांनी नोंद घेतली असती तर ते मणिपूरला गेले असते असे शरद पवार म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या:


Sharad Pawar : कम्प्लिट कोल्हापुरी 'पवार.'... शरद पवार जेव्हा जेव्हा कोल्हापुरात येतात, तेव्हा तेव्हा रमतात; शरद पवारांचे कोल्हापूरवर एवढं प्रेम का?