Ajit Pawar : पुण्यातीत चिंचवड आणि कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या ( Kasba Election ) प्रचाराला सुरूवात झाली आहे. कसबा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आजारी असलेल्या खासदार गिरीश बापट (Girish Bapat ) यांना प्रचारात उतरवल्यानं भाजपवर टीकेची झोड उठली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar ) यांनी देखील यावरून भाजवर टीका केली आहे. "गिरीश बापट सध्या आजारी आहेत. तरी देखील ऑक्सिजन लावून त्यांना प्रचारात उतरवलं जात आहे. आजारी माणसाला अशा पद्धतीने प्रचारात उतरवणं योग्य आहे का? पक्षाचं काम महत्वाचं की त्या व्यक्तीचा जीव महत्वाचा याचा विचार व्हायला  नको का? त्यांना ऑक्सिजन लावून प्रचाराला आणलं गेलं. अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. 


कोल्हापूर दौऱ्यावर असणाऱ्या अजित पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील यावेळी अजित पवार यांनी जोरदार टीका केली. "आम्ही मतदारसंघात जावून काम करत असतो. महाविकास आघाडीच्या माध्यमातून बळकटीकरण व्हावे यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे, ते आमचं कामच आहे. 27 तारखेला राज्याचे अधिवेशन आहे. त्यानिमित्ताने अनेक लोक भेटत असतात. त्यांच्या काही तक्रारी असतात, त्या तक्रारी सोडविण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे सुपुत्र आहेत. ते आमच्या पुण्यात आले आहेत. बापट यांच्या मतदारसंघात सव्वा लाखाचे मताधिक्य होतं ते त्यांनी 24 हजारापर्यत आणलं. चंद्रकांत पाटील यांचं देखील गेल्या काही दिवसांपूर्वी ऑपरेशन झालं. ते जे वक्तव्य करत आहेत ते पाहून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे का असं वाटत. स्वतःच्या मतदारसंघात एकही जागा निवडणूक आणता आली नाही. जिथं तुम्ही मोठं झाला तिथं तुम्हाला एक आमदार, एक खासदार निवडून आणता आलेलं नाही, असा टोला यावेळी अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. 


अजित पवार यांनी यावेळी भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर देखील टीका केली. "440 पेक्षा मोठा करंट आहे का बघा. पाच वर्षे तुम्ही मंत्री असताना तुम्हाला पक्षाने तिकीट दिलं नाही. तुमच्या पत्नीला तिकीट दिलेलं नाही, मग कशाला बोलता? स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याबद्दल काही तरी बडबडायाचे हे योग्य नाही, असे अजित पवार यांनी यावेळी म्हटले. 


महत्वाच्या बातम्या


Pune Bypoll election : 'त्रास बापट साहेबांना होत होता... पण यातना आम्हाला जाणवत होत्या'; 'या' नेत्याने घेतला आज प्रचार न करण्याचा निर्णय