job fair in shahu mill kolhapur: लोकराजा छत्रपती शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj) स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ व कृतज्ञता पर्व अंतर्गत जिल्हा प्रशासनाकडून आयोजित आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूर यांच्या प्रयत्नातून शाहू मिलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी करियर संधी मार्गदर्शन अंतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंगचे डॉ. संजय दाभोळे यांची कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये 350 विद्यार्थी सहभागी झाले. 


विद्यार्थ्यांसाठी जॉबफेअरचे आयोजन


कार्यक्रमास असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील, सचिव रणजीत नार्वेकर, खजिनदार राहुल मेंच, संचालक मंदार पेटकर,आदिनाथ पाटील,  सूर्यकांत दोडमिसे, धवल चौगुले, मनीष रजगोळकर, प्रसना कुलकर्णी उपस्थित होते. आज10 मे रोजी न्यू ट्रेंड्स इन नेटवर्किंग, दुपारी 2 वाजता आयडिया टू आयपीओ, त्याचबरोबर 12 मे रोजी कोल्हापुरातील आयटी वाढीबद्दल चर्चा करण्यासाठी एक सत्र आयोजित केले आहे. दरम्यान, पदवी व पदविका घेऊन कॉलेज व युनिव्हर्सिटीमधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी जॉबफेअरचे आयोजन 13 आणि 14 मे 2023 रोजी करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ अभियंता शाखेच्या जास्तीत जास्त विद्यार्थी-विद्यार्थिनींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आयटी असोसिएशनने केले आहे.


ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन 


दरम्यान, कृतज्ञता पर्वनिमित्त  6 ते 14 मे या कालावधीत शाहू मिल येथे  ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते 6 मे रोजी करण्यात आलं आहे. ग्रंथप्रदर्शनामध्ये शासकीय व इतर प्रकाशनाची पुस्तके, दुर्मिळ ग्रंथांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. या प्रदर्शनामध्ये विविध विषयावरील तसेच लहान मुलांसाठी दर्जेदार पुस्तके सवलतीच्या दरात उपलब्ध असून कोल्हापूरवासियांनी या ग्रंथप्रदर्शन व विक्रीच्या बुक स्टॉलला भेट देऊन ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी केले आहे.


महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमाने आणली रंगत


दुसरीकडे, महाराष्ट्राची लोकधारा' हा कार्यक्रम मंगळवारी पार पडला. याचे उद्‌घाटन ख्यातनाम सिने-नाट्य अभिनेते आनंद काळे यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्राची परंपरा, ओळख, संस्कृती सांगणाऱ्या या कार्यकमाची सुरुवात भोपाळीने झाली. त्यानंतर कृषी, आदीवासी संस्कृतीची ओळख करून देणारी गीते, लावणी, अध्यात्मिक गीते, भजन जागर -गोंधळ, पोवाडा, शौर्य गीते, व्यक्तींच्या दांभिकतेवर प्रहार करून त्याला जमिनीवर आणणारे भारुड आदी गीत गायनाने शाहू मिलचा परिसर आनंदून गेला. 


इतर महत्वाच्या बातम्या