कोल्हापूर : जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) मोठी धडक कारवाई करत बनावट दारू उत्पादन आणि विक्री करणारे रॅकेट (Illegal Liquor Racket) उघडकीस आणले आहे. जिल्ह्यातील हुपरी गावाच्या हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल 25 लाख 45 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल (Seized Liquor Worth Rs 25 Lakh) जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी एकूण चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील दारूवरील कर वाढवल्यानंतर दारूच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यभर बनावट दारूचा सुळसुळाट झाल्याचं चित्र आहे.
सदरच्या गुन्ह्यात हुपरी गावातील वसंतराव पाटील, अरुण बुरुंगले आणि अमीन शिकलगार या आरोपींना अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे, उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक क्रमांक 1 ने ही कारवाई केली. या भरारी पथकामध्ये निरीक्षक सदानंद मस्करे, कांचन सरगर, सचिन लोंढे, विलास पवार, सागर शिंदे, संदीप जानकर, सुशांत बनसोडे, अमोल यादव, साजीद मुल्ला यांनी सहभाग घेतला.
हॉटेलच्या पार्किंगमधून अवैध दारूचा पर्दाफाश (Illegal Liquor Bust)
24 डिसेंबर 2025 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे भोगावती परिसरातील एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये छापा टाकला. या ठिकाणी जुन्या दारुच्या साठ्याचा वापर करून त्यामध्ये पाणी आणि मद्यार्क मिसळून नवीन बनावट देशी दारू तयार करत असल्याचं आढळलं. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात अवैध दारू, कच्चा माल आणि वाहने आढळून आली. तपासात हे संपूर्ण नेटवर्क बेकायदेशीररित्या बनावट दारू तयार करत असल्याचे आणि ते विक्री करत असल्याचे स्पष्ट झाले.
25 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त (Seizure Details)
सदरच्या कारवाईत 2355.70 लिटर मद्य, अंदाजे 10 लाख 42 हजार रुपये किमतीची 2355.70 लिटर बनावट दारू, 91,500 रुपयांचा कच्चा माल, 14 लाख रुपये किमतीची वाहने, इतर साहित्य असा एकूण 25,45,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तीन आरोपींवर गुन्हा दाखल (Case Registered)
या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये वसंतराव पाटील, अरुण बुरुंगले आणि अमीन शिकलगार यांचा समावेश आहे. पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे.
अवैध दारूविरोधात मोहीम तीव्र (Excise Department Action)
राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे की, अवैध दारू उत्पादन, साठवणूक आणि विक्रीविरोधात अशीच कडक कारवाई पुढेही सुरू राहणार आहे. नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
ही बातमी वाचा: