Kolhapur Municipal Corporation Election: ज्या कोल्हापूरमधून महाविकास आघाडीचा श्री गणेशा झाला त्याच कोल्हापूरमध्ये आता महाविकास आघाडीचा शेवट होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून एकमत झालं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोबत जागा वाटपावरून चांगलीच खडाजंगी झाली आहे. त्यामुळे आज (25 डिसेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांना अल्टिमेटम दिला आहे. 

Continues below advertisement

तर आम्ही तिसरी आघाडी करण्यासाठी सक्षम आहोत

सन्मानजनक तोडगा काढणार नसाल, तर आम्ही तिसरी आघाडी करण्यासाठी सक्षम आहोत, असा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी महाविकास आघाडीमध्ये 14 जागांची मागणी केली आहे. मात्र या जागा देण्यात असमर्थता दर्शवल्याचे पाटील यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की आमच्या पक्षाला दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. काल महाविकास आघाडीचे पत्रकार परिषद असूनही आम्हाला म्हणजेच राष्ट्रवादीला बोलावलं नव्हतं. त्यामुळे आम्ही इंडिया आघाडीसह सतेज पाटील यांना उद्यापर्यंत अल्टीमेटम देत आहोत. आमच्याकडे अनेक पर्याय असल्याचा इशारा सुद्धा व्ही. बी. पाटील यांनी दिला. ते म्हणाले की उद्या आम्ही आमची भूमिका जाहीर करणार आहोत.

दोन्ही राष्ट्रवादी सोबत येण्याचा देखील पर्याय

पाटील यांनी सांगितले की, वेळ पडल्यास आम्ही तिसरी आघाडी सुद्धा करणार आहोत. दरम्यान, या सर्व पदाधिकाऱ्यांनी दोन्ही राष्ट्रवादी सोबत येण्याचा देखील पर्याय असल्याचे सांगत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आम्हाला आनंदच होईल अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवडनंतर कोल्हापूरमध्ये देखील दोन्ही राष्ट्रवादी येऊ शकतात असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल पवार यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, काँग्रेसकडून दबाव टाकला जात आहेत. आमचा सन्मान केला जात नाही, त्यामुळे आम्ही आज पाच वाजेपर्यंत वेळ देत आहोत. जर आमचा सन्मान राखला गेला नाही, तर दोन्ही राष्ट्रवादीसह तिसऱ्या आघाडीचा देखील पर्याय आमच्यासमोर आहे असेही त्यांनी म्हटलं आहे. 

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या