पुणे : राज्याची सांस्कृतिक नगरी आणि शिक्षणाची पंढरी असलेल्या पुणे (Pune) जिल्ह्यातील एका भोंदू बाबाचे अनेक कारनामे समोर आले असून पोलिसांनी (police) या बाबाला अटक केली आहे. अंधश्रद्धेचा फायदा घेत भक्तांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाची हायटेक विकृती समोर आली. प्रसाद दादा ऊर्फ बाबा ऊर्फ प्रसाद तामदार (वय 29, रा. सूस गाव, मुळशी) या तथाकथित बाबावर बावधन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, त्याच्या विरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलिसांनी बाबाला अटक केल्यानतंर तपासादरम्यान धक्कादायक समोर आली आहे. हा बाबा इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटच्या (mobile) माध्यमातून अश्लील चाळे करायचा. तर, भोंदू बाबाच्या आश्रमातून आता पोलिसांना वेगवेगळ्या गोळ्यांची पाकिटे आढळून आली आहेत.
आरोपी भोंदूबाबा प्रसाद हा भक्तांच्या मोबाइलमध्ये ‘हिडन ॲप’ डाऊनलोड करून भक्तांच्या खासगी क्षणांवर नजर ठेवत असे. याशिवाय, तो भक्तांना गुंगीचे औषध देऊन अश्लील चाळे करत होता. पोलीस तपासातून या कृत्याची झलक पाच वेगवेगळ्या भक्तांच्या चौकशीतून समोर आली आहे. बाबा स्वतःला भक्तांचे दोष स्वतःवर घेतो, त्यांच्यावर संकट आहे, आणि त्यासाठी विशिष्ट उपाय करतो, अशी बतावणी करत असे. जर एखाद्या भक्ताने बाबाच्या कृतीला विरोध केल्यास बाबा मृत्यूची तारीख लिहून भीती दाखवत असे, असेही पोलीस तपासातून समोर आलं आहे. त्यामुळेच, अनेक भक्त मानसिक दबावाखाली बाबाच्या सांगण्यानुसार वागत होते. त्यातच, आता पोलीस कोठडी संपत असताना पोलिसांनी आणखी सबळ पुरावे आढळून आलेाहेत.
भोंदू बाबाच्या आश्रमात गोळ्यांची पाकिटे
साधकांच्या मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करत त्यांचे खाजगी क्षण पाहणाऱ्या भोंदू बाबा प्रसाद तामदार याची पोलीस कोठडी संपत असतानाच पोलिसांनी या भोंदू बाबाच्या गळ्याभोवती फास आवळायला सुरुवात केली आहे. पोलिसांनी भोंदू बाबाच्या आश्रमातून 3 मोबाईल 2 ipad, सोलोपोशे 0.5md च्या गोळ्यांचं मोकळं पाकीट, प्रोव्हेनॉलच्या 9 गोळ्या, सिमकार्ड आणि पेन ड्राईव्ह हे साहित्य जप्त केलं आहे. भोंदू बाबाकडील इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ क्लिप्स असण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यासाठीच पोलीस हे सर्व साहित्य न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवणार असून त्यामध्ये नेमका कोणता डाटा आहे, याची माहिती घेणार आहेत.दरम्यान, भोंदू बाबाकडे इतर वैद्यकीय औषधंही मिळाली आहेत. या औषधांचा नेमका वापर काय? याचीही तपासणी पोलीस करणार आहेत.
हेही वाचा
भूकमारी... राज्यात कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक; मुंबईत सर्वाधिक संख्या, पुण्यात किती?