Kolhapur News : माजी रणजी खेळाडू व कोल्हापूर (Kolhapur News) जिल्हा क्रिकेट असोसिएशन वरिष्ठ निवड समितीचे सदस्य संग्राम अतितकर यांची महाराष्ट्र रणजी संघ निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र किक्रेट असोसिएशनच्या विविध उपसमित्यांवर संग्राम अतितकर यांच्यासह अमृता शिंदे, अतुल गायकवाड, शैलेश भोसले, केदार गयावळ, अभिजीत भोसले, चंदाराणी कांबळे यांचीही निवड करण्या आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये कोल्हापूरच्या सात जणांचा समावेश झाला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात निवडी झाल्याने एमसीएमध्ये कोल्हापूरची छाप असणार आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पुणेकडून विविध उपसमित्यांची घोषणा करण्यात आली. यामध्ये माजी रणजी खेळाडू व कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन वरिष्ठ निवड समितीचे सदस्य संग्राम अतितकर यांची महाराष्ट्र रणजी संघ निवड समितीच्या अध्यक्षपदी, तर माजी भारतीय कसोटी व एकदिवसीय महिला क्रिकेटपटू अमृता शिंदे यांची महाराष्ट्र 15 वर्षाखालील महिला संघ निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
एमसीएमध्ये कोल्हापूरची छाप
माजी रणजी खेळाडू अतुल गायकवाड यांची 19 वर्षाखालील महाराष्ट्र संघ व्यवस्थापकपदी, माजी रणजी खेळाडू व कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन ज्युनियर निवड समितीचे सदस्य शैलेश भोसले यांची 19 वर्षाखालील महाराष्ट्र संघ निवड समितीच्या सदस्यपद निवड झाली. केडीसीएचे सचिव केदार गयावळ यांची महाराष्ट्र स्पर्धा कमिटी सदस्यपदी, तर 19 वर्षाखालील महाराष्ट्र संघाचे खेळाडू व कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजानिस अभिजीत भोसले यांची नियुक्ती झाली. माजी महाराष्ट्र महिला संघाची माजी कर्णधार व आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू चंदाराणी कांबळे यांची महाराष्ट्र 19 वर्षाखालील व खुला गट महिला संघाच्या संघव्यवस्थापकपदी निवड झाली.
इतर महत्वाच्या बातम्या