Kolhapur, Sangli Rain Update: कोल्हापूर शहर जिल्ह्यासह तसेच सांगली जिल्ह्याला (Kolhapur Sangli Rain Update) सुद्धा परतीच्या मान्सून पावसाने काल (26 सप्टेंबर) दुपारपासून झोडपून काढण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर शहरात (Kolhapur heavy rain news) अनेक ठिकाणी संततधार पाऊस सुरु आहे. दुसरीकडे सांगलीत रात्रभर संततधार पाऊस जिल्ह्यात पडला असून सकाळ पासून संततधार सुरूच आहे. सततच्या या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काल दुपारी सांगली, मिरज, कुपवाड शहरात दिवसभर संततधार पाऊस सुरू झाला आणि आता सलगच्या पावसाने सखल भागामध्ये पाणीच पाणी साचून राहिले. या पावसाने शेतातील कामे ठप्प झाली. पावसामुळे द्राक्षबागांमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. ऑक्टोबर छाटणीस पावसाचा मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
सांगली महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांना आज सुट्टी (Sangli Miraj Kupwad schools holiday)
मध्यरात्रीपासून सांगली, मिरज शहरात जोरदार पाऊस पडतोय. त्यामुळे सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मध्यरात्री सांगली, मिरज शहरात मुसळधार पाऊस पडला. सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी पाऊस मात्र सुरूच आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांना आता प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. शेतामध्ये गुडघाभर पाणी साचून राहिल्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यात यावर्षी द्राक्ष बागायतदारांनी (Grapes farmers worried in Sangli rain) लवकर छाटण्या घेतल्या आहेत. परंतु आता पुन्हा पाऊस सुरू झाल्याने द्राक्ष बागायतदार चिंतेत आलेत. छाटणी घेतलेल्या द्राक्ष बागांवर दावण्या आणि करपा रोग पडण्याची शक्यता आहे. असाच पाऊस काही दिवस राहिल्यास याचा द्राक्ष बागायतदारांना मात्र मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे याची धास्ती आता द्राक्ष बागायतदारांनी घेतल्याचे दिसून येते.
सांगली जिल्ह्यातील 68 पैकी 21 मंडळांमध्ये अतिवृष्टी (Kolhapur Sangli weather update)
सांगली जिल्ह्यातील 68 पैकी 21 मंडळांमध्ये (Kolhapur Sangli weather update) अतिवृष्टी झाली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगाव आणि मिरज तालुक्यातील बेळंकी मंडळात सकाळी आठ वाजेपर्यंत मागील 24 तासात 90.8 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्व पाचही म्हणजे ढालगाव, देशिंग, कुणी, हिंगणगाव व कवठेमहांकाळ मंडळात 73.5 ते 90.8 मिलीमीटर पाऊस झाला. अग्रणी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील तासगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. तासगाव तालुक्यातील मांजर्डे, विसापूर, येळावी, मणेराजुरी,सावळज आणि वायफळे मंडळात अतिवृष्टी नोंदली गेली आहे.
अग्रणी नदी दुथडी भरून वाहू लागली (Agrani river flood)
सांगली जिल्ह्यातील खानापूर घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसाने अग्रणी नदी दुथडी भरून वाहू लागलीय. तसेच या दमदार पावसाने खानापूर घाटमाथ्यावच्या भागातील तलाव ओवरफ्लो झालेत. तसेच परिसरातील ओढे, नाले, तुडूंब भरून वाहू लागले होते तर रस्त्याना ओढ्याचे स्वरूप आलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या