Kolhapur Rain Update: कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत गेल्या 24 तासांपासून इंचाइंचाने वाढ सुरु आहे. आज (28 जुलै) दुपारी तीन वाजेपर्यंत पंचगंगा नदी पाणी पातळी 41 फुट 2 इंचापर्यंत पोहोचली आहे. राधानगरी धरणातून पाणी विसर्ग होत असूनही पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ न झाल्याने पूरबाधित भागाला मोठा दिलासा मिळाला आहे.

  


कोल्हापूर जिल्ह्यातील 11 बंधाऱ्यांवरील पाणी उतरले 


गेल्या आठवडाभरापासून पंचगंगा नदी पात्राबाहेर पडून इशारा पातळीवरून वाहत आहे. जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली गेले होते. दरम्यान, सलग तिसऱ्या दिवशी पावसाने उघडीप दिल्याने 11 बंधाऱ्यांवरील पाणी उतरले आहे. त्यामुळेही मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील बंधारे पाण्याखाली असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. 


पावसाने उघडीप दिल्याने दिलासा 


कोल्हापूर शहरात जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून उघडीप महापुराचे संकट टळले आहे. राधानगरी धरणातून होत असलेला विसर्ग तसेच पंचगंगा नदी इशारा पातळीवरून वाहत असल्याने आणखी पावसाचा जोर वाढला असता, तर महापुराची टांगती तलवार अटळ होती. मात्र, हवामान विभागाने पावसाचा इशारा देऊनही उघडीप दिल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. याची भीती सुद्धा व्यक्त करण्यात येत होती. पालकमंत्री दीपक केसर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पंचगंगेची पाणीपातळी ५० फुटांवर जाईल, असे जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. जिल्हाधिकाऱ्यांनीही सुद्धा पाणी पातळी सात ते आठ फूट वाढेल, असे सांगितल्यानंतर तातडीने स्थलांतर सुरु करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात इंचाइंचाने वाढ होत असल्याने दिलासा मिळाला. 


जिल्ह्यातील सर्व शाळा पूर्ववत


दरम्यान, काल (27 जुलै) झालेल्या आढावा बैठकीत दीपक केसरकर यांनी नागरिकांनी गोंधळून जाऊ नये. सतर्कता म्हणून आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतात, असे म्हटले होते. जिल्ह्यातील सर्व शाळा आजपासून पूर्ववत सुरु झाल्या आहेत. स्थलांतरित झालेल्या नागरिकांना आजपासून घरी जाण्यास सांगण्यात आले आहे. ज्या जिल्ह्यांमधील आज शाळांमधील परीक्षा रद्द करण्यात आली आहे, त्यांना नवीन तारखा देण्यात येतील. धोकादायक इमारतींवर तातडीने कारवाई सुरु करण्यात येईल, जिल्ह्यात पावसाच्या दुर्घटनेत दोन बळी गेले असून त्यांना शासकीय मदत करणार असल्याचेही केसरकर म्हणाले. 


जिल्ह्यातील एसटीचे कोणते मार्ग बंद 




इतर महत्वाच्या बातम्या