Kolhapur news : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. स्वतःच्या चितेची तयारी करुन एका वृद्ध दाम्पत्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वेतवडे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. आजारपणास कंटाळून दाम्पत्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊस उचललं आहे. महादेव पाटील आणि द्वारकाबाई पाटील अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावं आहेत.


आत्महत्येपूर्वी या वृद्ध दाम्पत्यानं चितेला लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव करुन ठेवली होती. आजारपणास कंटाळून या दाम्पत्याने गळफास घेऊन जीवन संपल्याची माहिती मिळत आहे.