Kolhapur Municipal Corporation: प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आणि बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कोल्हापूर महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे कोल्हापूर महापालिकेसाठी 20 प्रभाग असणार आहेत. 19 प्रभाग हे चार नगरसेवकांचे असतील, तर20 वा प्रभाग हा पाच नगरसेवकांचा असेल. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेसाठी 81 नगरसेवक असतील. दरम्यान या प्रभाग रचनेमध्ये अनेकांचा बालेकिल्ला ढासळल्याचे चित्र आहे. ज्या वाॅर्डामधून अनेक नगरसेवकांची निवडून येण्याची क्षमता होती ते प्रभाग विखुरले गेल्याने माजी नगरसेवकांना झटका बसला आहे. एक प्रभाग 28 हजार लोकसंख्येचा असल्याने निवडून येताना सुद्धा प्रभागामध्ये पायाला भिंगरी लावून इच्छुकांना काम करावं लागणार आहे. दुसरीकडे या प्रभाग रचनेवर 15 सप्टेंबरपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत. या प्रभाग रचनेमध्ये उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण या दिशा पद्धतीने करण्यात आली आहे. साधारणपणे एक वॉर्ड हा 25 ते 28 लोकसंख्येचा असणार आहे.
दुसरीकडे, कोल्हापूर महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर होताच सत्ताधारी आणि विरोधक सामने सामने आले आहेत. काँग्रेसकडून सत्ताधाऱ्यांच्या सोयीची प्रभागरचना झाल्याचा आरोप करत त्याला तीव्र आक्षेप घेण्याचा इशारा दिला. भाजपने विरोधकांकडे कोणतेच मुद्दे नसल्याने त्यांचे रडगाणे सुरू असून त्यांचे डिपॉझिट जप्त होईल असा पलटवार केला.
इतर महत्वाच्या बातम्या