Maheshwari Sarnobat: कोल्हापूरच्या 46 वर्षीय ॲथलीट महेश्वरी सरनोबत (Maheshwari Sarnobat) यांनी युरोपमधील (Europe) एस्टोनिया (टॅलिन) येथे पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या फुल आयर्नमॅन स्पर्धेत ( full Ironman in Europe) विलक्षण पराक्रम गाजवला. तब्बल 15 तासांत त्यांनी या कठीण स्पर्धेची यशस्वी पूर्तता करत जागतिक पातळीवर आपली छाप उमटवली. महेश्वरी यांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत 3 अत्यंत कठीण टप्पे होते. ज्यात 3.8 किमी पोहणे : तब्बल 5 अंश तापमानाच्या गोठवून टाकणाऱ्या समुद्रात पोहण्याची परीक्षा, 180 किमी सायकलिंग : प्रचंड थंड हवामानात आणि वादळी वाऱ्यांचा सामना करत लांब पल्ल्याचा प्रवास आणि 42.2 किमी मॅरेथॉन धाव : पूर्ण अंतराच्या मॅरेथॉनची झुंज याचा समावेश होता. महेश्वरी यांनी हे सर्व टप्पे पार करत फक्त 15 तासांत स्पर्धा पूर्ण केली.

Continues below advertisement

महेश्वरी यांनी चिकाटीने ध्येय गाठले

महेश्वरी सरनोबत (Maheshwari Sarnobat) यांचा हा पराक्रम म्हणजे केवळ एक क्रीडा कामगिरी नाही, तर कणखर इच्छाशक्ती, जिद्द, आत्मविश्वास आणि प्रचंड सहनशक्तीचा प्रेरणादायी नमुना आहे. जगभरातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतात, मात्र कठीण हवामान आणि अवघड मार्गामुळे अनेकांना शेवटपर्यंत पोहोचता येत नाही. मात्र, महेश्वरी यांनी आपल्या चिकाटीने हे ध्येय गाठले. महत्वाचे म्हणजे महेश्वरी सरनोबत या भारताच्या त्या काही मोजक्या खेळाडूंमध्ये मोडतात ज्यांनी इतक्या कठीण परिस्थितीत आंतरराष्ट्रीय स्तरावर फुल आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे. स्थानिक क्रीडा क्षेत्राने याला अविस्मरणीय कामगिरी अशी दाद दिली असून, महिलांसाठी आणि नव्या पिढीसाठी हा पराक्रम प्रेरणादायी ठरेल, असे मत व्यक्त केले जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Continues below advertisement