Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर महानगरपालिकेने सात गावांतील पाणीपट्टी थकबाकीदारांचे कनेक्शन तोडण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर मनपा 7 गावांमधील कर थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित करणार आहे. 


गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर मनपा 6 हजार 300 ग्राहकांना पाणी पुरवठा करते, ज्यात बहुतेक घरगुती ग्राहक आहेत. या ग्राहकांकडे एकूण 1.37 कोटी रुपये थकीत आहेत. या गावांकडे स्वत:चे जलस्रोत नसल्यामुळे केएमसीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विनंतीवरून या ग्राहकांना पाणीपुरवठा सुरू केल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. गेल्या काही वर्षांत, एमजेपीने या गावांमध्ये कनेक्शन आणण्यात यश मिळवले आहे, तथापि, बरेच लोक अजूनही पाणीपुरवठ्यासाठी मनपावर अवलंबून आहेत.


अलीकडे,कोल्हापूर हद्दवाढ कृती समितीने कोल्हापूर मनपा प्रशासनाने या गावांचा पाणीपुरवठा थांबवला पाहिजे, कारण या गावांना पाणी देणे मनपाला सक्तीचे नाही. दुसरीकडे ही गावे महापालिकेच्या हद्दीत विलीन होण्यास विरोध करत आहेत.


मनपाचे मुख्य हायड्रॉलिक अभियंता हर्षित घाटगे म्हणाले की, “आमच्याकडे थकबाकीदारांची यादी आहे. कराची थकबाकी वसूल करण्यासाठी आम्ही आमची टीम पाठवली आहे. आम्ही ही कारवाई नेहमीच करत असतो. या गावांतील अनेक ग्राहकांचा पुरवठा आधीच खंडित झाला आहे आणि त्यांनी थकबाकी भरली नसल्याने तो पूर्ववत झालेला नाही.”


इतर महत्वाच्या बातम्या