Kolhapur Election 2022 Ward 5 Mukt Sainik Vasahat Bapat Camp: कोल्हापूर मनपा निवडणूक वॉर्ड 5, मुक्त सैनिक वसाहत, बापट कॅम्प : कोल्हापूर महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 5 अर्थात मुक्त सैनिक वसाहत, बापट कॅम्प. नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 5 मध्ये मुक्त सैनिक वसाहत, बापट कॅम्प, जाधववाडी, तावडे हॉटेल, लोणार वसाहत, राजीव गांधी वसाहत या ठिकाणांचा समावेश होतो.
आरक्षण कसं आहे?
नव्या प्रभागरचनेनुसार कोल्हापूर महापालिकेसाठी एकूण 92 प्रभाग असून त्यापैकी 46 प्रभाग महिलांसाठी आरक्षित आहेत. प्रभाग क्रमांक 5 हा अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहे.
विद्यमान नगरसेवक 2015 ते 2020 :
मागील निवडणुकीमध्ये या प्रभागातून राजाराम गायकवाड (Tararani Aghadi Party), राहुल चव्हाण (Shivsena), दिलीप पोवार ( Congress) हे नगरसेवक निवडून आले होते.
मागील निवडणुकीमध्ये म्हणजे 2015 साली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि ताराराणी आघाडी हे पक्ष स्वतंत्र लढले होते.
वॉर्ड कुठून कुठपर्यंत?
या प्रभागात मुक्त सैनिक वसाहत, बापट कॅम्प, जाधववाडी, तावडे हॉटेल, लोणार वसाहत, राजीव गांधी वसाहत या ठिकाणांचा समावेश होतो.
राजकीय स्थिती- समिश्र स्थिती
या परिसरावर सतेज पाटील, महाडिक गट आणि शिवसेनेचा समिश्र प्रभाव असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे या प्रभागावर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी सर्व गटाकडून प्रयत्न केले जात आहेत. या प्रभागात तीनही नगरसेवक आपल्याच गटाचे असावेत यासाठी काँग्रेसचे सतेज पाटील आणि महाडिक गटाकडून रणनीती आखणी सुरू आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||
ताराराणी आघाडी | ||
अपक्ष/इतर |